Fuel Shortage Maharashtra इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर लांब रांगा? महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घ्या. आधीच इंधन दरवाढीने त्रस्त असलेली जनता आता थेट पेट्रोल पंपांवरच्या टंचाईमुळे रांगेत उभी राहायला लागली आहे. कधीकाळी नोटाबंदीच्या दिवसांत लोकं बँकेबाहेर तासन् तास उभं असायचे, आता तीच वेळ पेट्रोलसाठी आली आहे. केंद्र सरकार आधी म्हणत होतं, देशात पुरेसा इंधन साठा आहे. पण पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, कॅन घेऊन इंधनासाठी उभे लोक, हे सरकारला दिसत नाही का? आणि दिसत असेल, तर मग टंचाई नाही हे सरकार वारंवार का सांगतंय? जर टंचाई नाही, तर ‘पेट्रोल संपलं’चे बोर्ड का लावतायत पंपावाले? हे कोण उत्तर देणार?
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! निवृत्त शिक्षकांनीच लीक केले प्रश्न?
लोक रोजचे व्यवहार चालावेत म्हणून वाढत्या भावातदेखील इंधन घेतायत, पण तिथेही टंचाई. मग यांनी काय करावं? शेतीच्या हंगामात डिझेल मिळत नव्हतं, परिणामी उपकरणं बंद पडलीत. शेतकरी आधी खतासाठी, आता डिझेलसाठी तासन् तास रांगेत उभा. याच वेळी प्रधानमंत्री मोदींचे इटलीच्या पीएम मेलोनींसोबतचे फोटो, चॉकलेट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. लोकं तुलना करतायत – रोम जळत असताना निरोने फिडल वाजवला, तसं आपली इथं परिस्थिती आणि तिकडे पंतप्रधान परदेश फेरफटका मारतायत, असं लोकांमध्ये बोललं जातंय. पण काही लोक यावरही टोमणे मारतात – भारतातील चॉकलेट इटलीला विकलं तर फॉरेन एक्सचेंज मिळेल ना! कुणाला काय कळतं?
या चॉकलेट डिप्लोमसीवर सोडून द्या. प्रत्यक्षात, महागाईचा स्फोट होतोय आणि त्यावर केंद्र सरकारवर टीका होतेय. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक बँकांना जास्तीचे कर्ज देऊ नका, दर वाढवा, असं सांगते. त्यामुळे घरकर्ज, कार लोन, पर्सनल लोन महाग होतील. बाजारातला पैसा कमी होईल म्हणून एफडीचे दरही वाढवणार, म्हणजे लोकांनी खर्च कमी करून बँकेत पैसे ठेवावेत.
यात अजून एक गडबड – सोशल मीडियावर अफवा पसरतेय, की महागाई आणि आर्थिक पत वाचवण्यासाठी लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू शकतात. सरकारने तसं काही जाहीर केलं नाही, तरीही इंधन टंचाईमुळे अशी भीती आहे. तज्ज्ञ म्हणतात, आता लॉकडाऊन परवडणार नाही. सरकारकडे महागाई रोखण्याचं ठोस नियोजन नाही? त्यामुळेच आर्थिक धोरण फेल गेलं, असा आरोप होतोय. मोठ्या कंपन्यांना कर सूट मिळते, सामान्य जनतेवर मात्र जीएसटी-इंधन करांचा भार. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्यात – तांदूळ, गहू, डाळी २०-३०% वाढल्यात. तेल, दूध, भाजीपाला, कांदा-बटाटा, सगळंच महागलं. त्यातही औषधांचे दर वाढले. पेट्रोल, डिझेल, गॅस आधीच महाग. त्यामुळे सगळ्या वस्तू महाग झाल्यात, लोकांचा आठवड्याचा, महिन्याचा घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडलाय.
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! निवृत्त शिक्षकांनीच लीक केले प्रश्न?
हे सगळं चालू असताना पंतप्रधान मोदी फक्त “सोने घ्या नका, इंधन वाचवा,” इतकेच म्हणतात. पण आर्थिक परिस्थिती, महागाईबद्दल थेट संवाद नाही. जनतेला आणि विरोधी पक्षांना विश्वासात घ्या, देशाच्या आर्थिक स्थितीविषयी बोला, सर्वपक्षीय बैठक किंवा विशेष अधिवेशन घ्या – हे अपेक्षित. पण त्याऐवजी सगळं धूसर सुरू आहे. आत्ताच नॉर्वेमध्ये एका पत्रकार महिलेने मोदींना विचारलं – भारतात पत्रकारांना कधी प्रश्न विचारायची मुभा मिळेल? त्यावर उत्तर न देता मोदी मंच सोडून गेले. यावरून राजकारण तापलंय – काहींनी त्यांना हिरो ठरवलं, काहींनी स्टंट म्हणलं. पण हे स्पष्ट – परदेशातसुद्धा मोदी पत्रकारांचे प्रश्न टाळतात, अशी छाप बसतेय. नोटाबंदी असो, लॉकडाऊन असो – फक्त भाषण, संवाद नाही.
इंधन दरवाढीच्या प्रश्नावरही असंच. पंतप्रधान घरी येतात, तेव्हा काय भूमिका घेतील? निवडणुका होईपर्यंत काहीही बोलायचं नाही, प्रचार, रॅली करायच्या, त्यावर खर्च करायचा. आणि निवडणुका झाल्या की “सोनं घ्या नका.” २०१३ मध्ये मनमोहन सिंग यांच्या काळात सरकारने असे निर्णय घेतले, तेव्हा किमान लोकांचं इंधन, जीवनावश्यक वस्तू थोपवलं नव्हतं, हे लक्षात घ्या.
Maharashtra Weather Update Marathi | पाऊस आणि Heatwave चा मोठा इशारा
इथे मात्र समृद्धी महामार्ग, अटल सेतू, नवनवीन कनेक्टिंग रस्ते – सगळं झालंय, पण पेट्रोल कुठे मिळतंय? वाहनं, ट्रक, शेतकरी, सामान्य लोक रात्रभर रांगेत उभे – “कधी डिजेल मिळेल?” असं पाहतायत. आधुनिक भारताचं स्वप्न दाखवलं, पण वास्तवात देश अधोगतीकडे चालला आहे की काय, हे रोज लोक विचारतात.
या सगळ्या गोंधळात, सरकार मुद्दाम जनतेला अंधारात ठेवतंय, सत्य लपवतंय असं लोकं म्हणतात. यावर रोज संवाद, सरकारने स्पष्ट भूमिका घेतली, तरच सामान्य माणूस विश्वासाने पुढे जाईल. जय महाराष्ट्र.
#PetrolDiesel,#FuelShortage,#MaharashtraNews,#PetrolPrice,#DieselPrice,#Inflation,#FuelCrisis,#BreakingNews,#MarathiNews,#IndiaNews