Maharashtra Weather Update Marathi | पाऊस आणि Heatwave चा मोठा इशारा. अनेक दिवसांपासून महाराष्ट्र वाट बघतोय की कधी एकदाचा पाऊस येतोय आणि या उष्णतेपासनं आपल्याला दिलासा मिळतोय. तर महाराष्ट्रातल्या काही भागांना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा दिलासा मिळणार आहे. तर महाराष्ट्रातल्याच एका वेगळ्या भागाला मात्र पुन्हा एकदा हीट वेव्हचा सामना करावा लागणार आहे. सध्या नक्की काय परिस्थिती आहे, मॉन्सून कुठपर्यंत आलेला आहे आणि पुढचे तीन दिवस महाराष्ट्रात काय अलर्ट असणार आहे?
सर्वात पहिलं आपण समजून घेऊयात की नक्की काय परिस्थिती आहे आणि कशामुळे महाराष्ट्रात आपल्याला पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. आत्ता आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याचबरोबर अरबी समुद्रात सुद्धा मान्सूनला प्रतिकूल अनुकूल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते तयार झालेले आहेत आणि त्यांच्या मदतीनंच मान्सून जो आहे त्याचं आगमन हे लवकर होणार आहे भारतामध्ये. केरळमध्ये 26 मे ला ते होणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात असा अंदाज बांधला जातोय की, 1 ते 3 जूनच्या मध्ये आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा पाऊस बघायला मिळू शकतो, मान्सूनचं आगमन जे आहे ते होऊ शकतं.
पण आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस जो आहे त्याचं, आत्ता पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो, ज्याला आपण प्री मॉन्सून शॉवर्स असं म्हणतो, तशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे, आणि तोही का आपल्याला बघायला मिळणार आहे? तर अरबी समुद्रामध्ये हे जे आपल्याला एक क्षेत्र तयार झाल्याचं बघायला मिळतंय जिथे आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र तर तयार झालेलंच आहे, पण त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जे थंड वारं आहे, जे वारे आहेत ते आता आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेनं आपल्याला जाताना बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, प्री मॉन्सून शॉवर्स साठीची.
मान्सून अजून दाखल झालेला नाहीये, त्याच्यामुळे आपण ऑफिशियली पावसाळा सुरू झाला असं म्हणू शकत नाही, पण हो आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी मात्र आता आपल्याला पाऊस बघता येणार आहे. सो, तर महाराष्ट्रात नक्की काय परिस्थिती आहे? ते आपण बघूयात. हवामान खात्याचे जे के. एस. होसाळीकर सर होते जे अनेक वर्ष हवामान खात्यामध्ये कार्यरत होते, त्यांनी ही इमेज जी आहे ती शेअर केलेली आहे त्यांच्या सोशल मीडियावरती आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की, मॉइश्चर इनकर्जन जे आहे, ते मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळतं, तसं आपण क्लिअरली या फोटोमध्ये सुद्धा बघू शकतो आणि त्यामुळे काय होतंय? तर आपल्याला इथे एक ढगाळ वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि महाराष्ट्रातला, एस्पेशली कोकण पट्टा जो आहे, कोकण पट्टा, मुंबई आणि त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणामध्ये जो आपल्याला साऊथ महाराष्ट्र आहे तिथे सुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो.
वेगाने वारे जे आहेत ते वाहू शकतात, ढगाळ वातावरण जे आहे ते तयार होऊ शकतं आणि आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो, असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. सो, आपण त्याचमुळे आपण बघणार आहोत की पुढचे आता तीन दिवसांचा अलर्ट जो आहे, तो कसा असणार आहे? कुठल्या भागात पाऊस आणि कुठल्या भागात आपल्याला हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलेला आहे? सो, आपण अनेक दिवसांपासून बघतोय की विदर्भामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात ऊन बघायला मिळतंय, हीट वेव्ह आहे, साधारण 47°C इतकं तापमान जे आहे ते गेलेलं होतं. ब्रम्हपुरी मध्ये आपण बघितलं की 47°C हे तिथलं रिसेंट तापमान होतं. त्याच्यामुळे सॅटरडेसाठीचा जो अंदाज आहे, तो काय आहे तो आपण बघणार आहोत. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाराच्या व्यतिरिक्त, नागपूर आणि आपल्याला इतर या सर्व भागांमध्ये आपल्याला ऑरेंज आणि उष्णतेचा रेड अलर्ट दिल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळेच नागरिकांनी प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे, काम नसेल तर घराच्या बाहेर अजिबात पडू नये, असा, अशी वॉर्निंग जी आहे ती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे.
अतिशय हे ऊन जे आहे ते, ते बोच्रं ऊन आहे. आपल्याला उन्हाचा झटका बसू शकतो, हीट वेव्हचा आपल्याला जो त्रास होतो, तो त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे नागरिकांनी जर गरज नसेल, तर घराच्या बाहेर पडू नका, असा आवाहन हवामान खात्याकडनं करण्यात आलेला आहे. त्याशिवाय आपण जर खालचा भाग बघितला, जसं मी म्हटलं की सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, साताऱ्यातला घाट परिसर असेल, या, लातूर असेल, धाराशिव असेल, या संपूर्ण भागांमध्ये मात्र येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे, पावसासाठीचा. सो, इथे तुम्हाला काही प्रमाणामध्ये अगदी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो, त्याच्यासाठीच त्यांनी येल्लो वॉर्निंग जी आहे, ती सुद्धा इथे येल्लो अलर्ट जो आहे तो सुद्धा या जिल्ह्यांना दिलेला आहे.
आता आपण संडेचा काय अंदाज आहे ते आपण समजून घेऊया. संडेला आपण अकोला, अमरावती हा सो भाग आहे, जसं मी म्हटलं, तर पुन्हा एकदा तिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रविवारसाठी. त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली इथे सुद्धा अलर्ट जो आहे, तो देण्यात आलेला आहे, हीट वेव्हसाठीचा हा अलर्ट आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी काम नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, हे पुन्हा एकदा हवामान खात्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात मात्र जिथे येल्लो अलर्ट आपल्याला बघायला मिळत होता, दक्षिण भागामध्ये सध्या मात्र जिथे येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत होता. दक्षिण भागामध्ये महाराष्ट्राच्या तिथे मात्र आता कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. पण वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि पाऊस अगदी तुरळक ठिकाणी अगदी कमी प्रमाणात पाऊस जो आहे तो सुद्धा पडू शकतो असा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. आता आपण सोमवारी काय परिस्थिती असणार आहे ते सुद्धा आपण बघूयात.
सोमवारी सुद्धा पुन्हा एकदा तसंच आहे की विदर्भात आपल्याला कुठल्याही प्रकारचा दिलासा लोकांना मिळतांना आपल्याला बघायला मिळत नाहीये कारण की ऑरेंज अलर्ट जो आहे तो अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर, चंद्रपूर, अकोला या संपूर्ण भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया इथे मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण तरीसुद्धा तापमानात प्रचंड वाढ होऊ शकते आणि लोकांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे. हेच याच्यातन आपल्याला पुन्हा एकदा हायलाईट करावसं वाटतंय. मी पुन्हा पुन्हा सांगते की विदर्भातल्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की हीट वेव्ह, हीट स्ट्रोक जो आहे तो होऊ शकतो आणि त्याचा प्रचंड त्रास होतो त्याच्यामुळे खरंच नागरिकांनी तिथल्या काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या जिल्ह्यात, आत्ता जर तुम्ही विदर्भात असाल तर तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. किती तुमचं तापमान तुमच्या इथे गेलेलं होतं अंदाज असा आहे की 45 ते 47°C इतकं तापमान तिथे आपल्याला विदर्भात बघायला मिळतंय.
खरंच अशी परिस्थिती झालेली आहे का? खरंच इतकं तापमान गेलेलं आहे का? तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि उर्वरित महाराष्ट्राचं तुम्ही म्हटलं की पुणे असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि धाराशिव इथे पुन्हा एकदा वादळी वारे वाहू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं. त्याचबरोबर अगदी काही प्रमाणात थोडका पाऊस जो आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो असा अंदाज जो आहे तो सोमवारसाठीचा वर्तवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे पुढचे तीन दिवस हे क्रुशल आहेत. कोकण पट्ट्यासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर विदर्भासाठी सुद्धा. मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र काही प्रमाणामध्ये तापमान जे आहे ते थोडंसं कमी होऊ शकतं. एक ते दोन डिग्रीचा फरक जो आहे तो आपल्याला पडताना म्हणजे पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पण इथे सुद्धा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तिथे कुठलीही वॉर्निंग दिलेली नसली तरीसुद्धा तिथे उष्णतेचा त्रास होऊ शकतो असं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे. हा होता पुढच्या तीन दिवसांचा अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
#MaharashtraWeather #Heatwave #RainAlert #MonsoonUpdate #WeatherNews #MarathiNews #IMD #VidarbhaHeatwave #Paus #WeatherUpdate