Tukaram Mundhe Success Story: शेतकऱ्याच्या मुलापासून IAS Rank 20 पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

 

तुकाराम मुंडे हे नाव महाराष्ट्रात परिचयाचं नाही अशी व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे मुंडे सर हे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद, मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्यांचं नाव प्रसार माध्यमांमध्येही नेहमी असतं.

Tukaram Mundhe Success Story: शेतकऱ्याच्या मुलापासून IAS Rank 20 पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

Tukaram Mundhe Success Story: शेतकऱ्याच्या मुलापासून IAS Rank 20 पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
Tukaram Mundhe Success Story: शेतकऱ्याच्या मुलापासून IAS Rank 20 पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी इथं पर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुंडे सर यांनी फार हाल अपेक्षा सहन करत यशाची उंची गाठली.

आज आपण त्यांच्या प्रवासा बद्दल जाणून घेणार आहोत. तुकाराम मुंडे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावचे आहेत. गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे ५ हजाराच्या आसपास. हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते. तुकाराम मुंडे यांचं बालपण गावातच गेला आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची. त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची. त्यानंतर आठवड्याचा संसार आणि दोन वेळचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीने प्रयत्न करायचे, अशी गावची परिस्थिती होती.

Table of Contents

Tukaram Mundhe Success Story: शेतकऱ्याच्या मुलापासून IAS Rank 20 पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

तुकाराम मुंडे यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती भेताची असल्याने त्याच परिस्थितीत शिक्षण घेतलं. मुंडे सर यांनी नववी आणि दहाव्या वर्षीची शेती करायला सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी चौथीत शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतीचं काम सुरू केलं.

मुंडे सर यांचे बंधू बीडला शिक्षण घेत होते. महिन्याला १०० ते २०० रुपये पाठवण्यासाठी त्यांना तगसरत करावी लागत होती आणि शेतीतून उत्पन्न कमी मिळत होते. दहावी नंतर गावात शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या बंधूंनी मुंडे सर यांना औरंगाबादला नेलं.

मुंडे सर यांनी पहिला सिनेमा दहावी नंतरच पाहिला होता.

त्यामुळे गावातून थेट औरंगाबाद सारख्या शहरात येणं त्यांच्यासाठी खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता. त्यावेळच्या परिस्थितीत कसं सामावून घ्यायचं हे माहित नव्हतं, पण त्यांच्या बंधूंनी मार्गदर्शन केलं. तुकाराम मुंडे यांच्या मोठ्या भावाला आयएएस व्हायचं होतं, पण आर्थिक परिस्थिती बाजूने नसल्याने त्यांना ते शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ती अपेक्षा मुंडे सर यांच्याकडे व्यक्त करत, तुला कलेक्टर व्हायचं आहे असं सांगितलं. कलेक्टर काय असतं, ते कसं व्हायचं असतं, त्यासाठी काय करावं लागतं, यातलं मुंडे सर यांना काहीही माहिती नव्हतं. फक्त भावाने सांगितलं, कलेक्टर व्हायचं म्हणून होणार, या दृष्टीने अकरावी-बारावीचं शिक्षण सुरू केलं. त्यासाठी सायन्स घेतलं होतं.

मुंडे सर हे आता सांस्कृतिक धक्क्यातून बाहेर येत होते. शहरातील वातावरणाशी जुळवून घेणं आणि अभ्यास करणं, ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणं याकडे त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि काम करत राहिले. मुंडे सर यांना बारावीला बायोलॉजी ग्रुपला ९२% मार्क्स मिळाले. तुकाराम मुंडे औरंगाबादला आले तेव्हा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न होताच. त्यांचे बंधू तेव्हा क्लासेस घ्यायचे. त्यांच्या माध्यमातून ते स्वतःचा आणि मुंडे सर यांचा खर्च सांभाळत होते. तुकाराम मुंडे यांनी यूपीएससीचा अभ्यास करायचा ठरवलं होतं. बंधूंनी जेव्हा सांगितलं, कलेक्टर व्हायचे, तेव्हा होता येईल असं आपण म्हणालो, पण ही परीक्षा काय असते, त्यावेळेस माहिती नव्हती. पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची कल्पना सुद्धा नव्हती, असं मुंडे सर सांगतात.

मुंडे सरयांनी यूपीएससीचा अभ्यास करायला घेतला.

तेव्हा ही परीक्षा किती अवघड असते, त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात, नुसतं चार पुस्तकं वाचून किंवा बी.ए. सारखा अभ्यास करून त्यात यश मिळत नाही, याची जाणीव झाली. यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट होत गेली. अनेक प्रश्न उभे राहिले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जर आपण यूपीएससी किंवा आयएएस झालो नाही, तर काय होणार, हा प्रश्न तुकाराम मुंडे यांच्या समोर होता. मुंडे सर हे पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये फेल झाले. त्यांना ८६५ मार्क्स मिळाले, जे मेरीटपेक्षा फार कमी होते. यानंतर मुंडे सर यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. यात ते प्रिलियम पास झाले, पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं.मुंडे सर यांचं एका बाजूला मन विषण्ण होतं, तर दुसऱ्या बाजूला ध्येय गाठायचं होतं.

अशा परिस्थितीत बाजूला ध्येय गाठायचं होतं

अशा परिस्थितीत हा प्रयत्न चालू होता चांगली बाजू एवढी होती की पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये जितके मार्क्स मिळाले होते त्यापेक्षा यावेळी शंभराहून जास्त मार्क्स जास्त मिळाले होते म्हणून मुंडे सर यांनी परत तिसरा प्रयत्न केला यावेळी तुकाराम मुंडे यांनी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत मजल मारली मुलाखत झाली पण अंतिम निवड झाली नाही. दोन हजार ते दोन हजार तीन या काळात मुंडे सर यांनी लेक्चरशिप केली त्यांच्यातून मिळणाऱ्या पैशात पीएचडीला सुरुवात केली.

दोन हजार तीन साली

एमपीएससीचा अंतिम निकाल आला तुकाराम मुंडे यांचं क्लास टू मध्ये सिलेक्शन झालं पण त्यावेळी मुंडे सर यांनी दोन हजार चार रोजी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं मग त्यासाठी तयारी सुरू केली पहिल्या तीन प्रयत्नात ज्या काही चुका झाल्या होत्या तृटी होत्या त्यावर मुंडे सर यांनी विचार केला आणि लक्षात आलं की जास्त अभ्यास करण्यापेक्षा यूपीएससी साठी गरज आहे त्यावर विचार मंथन केलं लेक्चरशिप केल्याने उत्तरात काय अपेक्षित आहे याची त्यांना चांगलीच माहिती आली.

दोन हजार चार साली

मुंडे हे प्रिलिम्स पास झाले मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरू केली. दोन हजार पाच च्या एप्रिल मे महिन्यात मुंडे यांची मुलाखत 18 मे 2005 रोजी अंतिम निकाल आला त्यावेळी मुंडे यांची भारतातील रँक 20 होती. मुंडे सर म्हणतात हा प्रयत्न खडतर नक्कीच होता पण हा प्रवास फोकस्ड आणि नियोजन बद्ध असल्याने तसेच माझ्या ध्येयापासून कोणत्याही प्रकारे विचलित न झाल्याने मी हे करू शकलो.

FAQ Schema Content

Q1. Tukaram Mundhe कोण आहेत?

Tukaram Mundhe हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध IAS अधिकारी असून त्यांच्या कडक प्रशासन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात.

Q2. Tukaram Mundhe यांचे मूळ गाव कोणते?

त्यांचे मूळ गाव ताडसोन्ना, जिल्हा बीड, महाराष्ट्र आहे.

Q3. Tukaram Mundhe यांनी UPSC किती प्रयत्नात पास केली?

त्यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Q4. Tukaram Mundhe यांना UPSC मध्ये किती रँक मिळाली?

UPSC 2005 मध्ये त्यांना अखिल भारतीय 20 वी रँक मिळाली.

Q5. Tukaram Mundhe यांचे शिक्षण कुठे झाले?

दहावीपर्यंत शिक्षण गावात झाले आणि त्यानंतर औरंगाबाद येथे उच्च शिक्षण पूर्ण केले.

हे पन नक्की वाचा

Should We Give Up Farming? आपण शेती खरंच विकली पाहिजे का?

शेतकरी जगाचा पोशिंदा का? | “जय जवान जय किसान” यामागचा खरा अर्थ

#TukaramMundhe #IASOfficer #UPSCSuccessStory #MarathiBiography #MotivationalStory #UPSCMarathi #SuccessStory #Maharashtra #IASJourney #FarmerToIAS #Inspiration #UPSCPreparation #BiographyMarathi #TukaramMundheStory #MarathiNews #TukaramMundheSuccessStory Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story, Tukaram Mundhe Success Story,

Leave a Reply

Translate »