लग्न आता गरज कमी आणि रिस्क जास्त Marriage Fear India ? भारतातील वैवाहिक नात्यांमधील वाढती भीती आणि वास्तव. पूर्वी लग्न म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात मानली जायची. आता अनेकांसाठी ती रिस्क वाटू लागली आहे. एका बाजूला मुलींना भीती आहे. हुंड्यासाठी छळ होईल का? सासरी सुरक्षित राहू का? तर दुसऱ्या बाजूला काही मुलांमध्येही एक नवीन भीती वाढताना दिसतेय. लग्नानंतर नात्यात फसवणूक झाली तर, खोट्या केसेसमध्ये अडकवलं गेलं तर, किंवा एखाद्या वैवाहिक वादातून स्वतःच आयुष्य उध्वस्त होईल का?
Maharashtra Weather Update Marathi | पाऊस आणि Heatwave चा मोठा इशारा
भारत एआय टेक्नॉलॉजी आणि स्पेसमध्ये प्रगती करतोय पण नातेसंबंधांच्या बाबतीत समाजात अजूनही भीती, हिंसा आणि अविश्वास वाढताना दिसतोय. नमस्कार, मी सिहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी. आज आपण पाहणार आहोत भारतात लग्न आता हळू हळू गरज कमी रिस्क जास्त का वाटू लागलाय? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एनसीआरबीच्या 2024 च्या आकडेवारीनुसार, भारतात एका वर्षात तब्बल 5737 महिलांचा हुंडा बळीमुळे मृत्यू झालाय. म्हणजे जवळपास प्रत्येक 90 मिनिटांनी एका विवाहित महिलेचा हुंडा, छळ किंवा संशयास्पद वैवाहिक मृत्यूमुळे जीव जातोय. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली असून, त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालचा क्रम लागतो.
महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक असल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2026 च्या सुरुवातीला काही महिन्यांतच हुंडा छळाची 124 प्रकरण नोंदवली गेलीयत. या प्रत्येक आकड्यामागं फक्त एक केस नसते, तर एका मुलीचं आयुष्य, एका कुटुंबाचं तुटलेलं घर आणि समाजाच्या मानसिकतेवरचा एक काळा डाग असतो. पण या चर्चेची दुसरी बाजू आता समोर येऊ लागलीय.
Maharashtra Weather Update Marathi | पाऊस आणि Heatwave चा मोठा इशारा
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, लग्नाशी संबंधित तणावामुळे आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या प्रथमच महिलांपेक्षा जास्त झाली आहे. आकडे सांगतात की, विवाहाशी संबंधित तणाव, वाद, वेगळं होणं, आर्थिक दबाव किंवा कौटुंबिक संघर्षामुळे 4863 पुरुषांनी आत्महत्या केली आहे. तर महिलांची संख्या 4180 होती. विशेषतः 30 ते 45 वयोगटातील विवाहित पुरुषांमध्ये मानसिक ताण आणि कौटुंबिक संघर्षाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसतंय. याशिवाय काही राज्यांमधील आकडेवारीतून आणखी एक धक्कादायक ट्रेंड समोर आलाय.
उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये गेल्या काही वर्षात 785 पतींची हत्या त्यांच्या पत्नीकडून झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. तपासांमध्ये अनेक प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक वाद आणि वैवाहिक संघर्ष ही कारणं समोर आली आहेत. याचा अर्थ असा नाही की पुरुष किंवा महिला यांच्यापैकी कोणाचा संघर्ष मोठा आहे. तर याचा अर्थ असा आहे की समाजातील वैवाहिक नात्यांमध्ये विश्वास कमी होत चाललाय. एका बाजूला महिलांना अजूनही हुंडा, छळ आणि हिंसेची भीती आहे. तर दुसऱ्या बाजूला काही पुरुष मानसिक ताण, वैवाहिक वाद आणि कायदेशीर संघर्षामुळे घाबरतायेत.
Maharashtra Weather Update Marathi | पाऊस आणि Heatwave चा मोठा इशारा
तज्ञांच्या मते या समस्येवर फक्त कायदे कठोर करणं पुरेसे नाही, भावनिक मॅच्युरिटी, मेंटल हेल्थ सपोर्ट, प्री-मॅरिटल काउन्सिलिंग आणि आर्थिक व सामाजिक अपेक्षांमध्ये बदल होणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण आज अनेक लग्नं प्रेमापेक्षा प्रेशरमध्ये जास्त होताना दिसतायेत, तर अनेक नाती सोशल मीडिया, फायनान्शिअल स्ट्रेस, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशनमुळे तुटतायेत. लोकशाही आणि आधुनिक समाजात महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसे विरोधात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी पुरुषांच्या मानसिकते, पण त्याच वेळी पुरुषांच्या मानसिक आरोग्य विषयी, वैवाहिक तणावा विषयी आणि कौटुंबिक संघर्षांमधील त्यांच्या बाजू विषयी समाजाने गंभीरपणे बोलण्याची गरज वाढतीय.
#लग्न #Marriage #Relationship #MarathiNews #SocialIssue #MentalHealth #IndianSociety #MarriageProblems #Dowry #FamilyIssues