लग्नाला अवघे 20 दिवस बाकी होते.
लग्नाच्या 20 दिवस आधी दुर्दैवी मृत्यू! लोहगड किल्ल्यावर 350 फूट दरीत कोसळून केतन अग्रवालचा ( Ketan Agrawal ) मृत्यू, नेमकं काय घडलं? उदयपूर मधील तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी दोन खासगी विमानांची ही व्यवस्था करण्यात आली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. लोहगड किल्ल्यावर फोटो काढताना एका तरुणाचा तोल गेला आणि तो सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्होचा होत आहे.
मृत तरुणाचं नाव केतन अग्रवाल ( Ketan Agrawal ). तो प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. केतनचं ( Ketan Agrawal ) लग्न अत्यंत राजेशाही थाटामाटात होणार होतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण असतानाच अचानक आलेल्या या दुःखद घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं.

ही घटना 19 जून रोजी घडली.
माहितीनुसार, आपल्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देण्यासाठी केतन ( Ketan Agrawal ) लोहगड किल्ल्यावर गेला होता. मात्र तिथेच काळाने त्याच्यावर झडप घातली. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचं सांगितलं जात होतं. फोटो काढताना अचानक तोल गेल्याने तो दरीत पडल्याची माहिती समोर आली होती. मात्र या घटनेनंतर बचाव कार्यात सहभागी झालेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आणि समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं आहे.
घटना घडल्यानंतर ट्रॅकर्स आणि स्थानिक बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी कोणताही विलंब न करता शोध मोहीम सुरू केली. अखेर केतन ( Ketan Agrawal ) सुमारे 350 फूट खोल दरीत आढळला. यानंतर त्याला तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. पुढील तपासा दरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याची चर्चा असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
नुकताच तो परदेशातून शिक्षण पूर्ण करून परतला होता
आणि कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली होती. त्याचं लग्न अत्यंत राजेशाही थाटात होणार होतं. राजस्थान मधील एका भव्य पॅलेसमध्ये लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता. पाहुण्यांसाठी खास विमानांची व्यवस्था, महागडे दागिने, डिझायनर कपडे अशा सगळ्या तयारीला वेग आला होता. घरात आनंदाचं वातावरण असतानाच नियतीने मात्र वेगळाच डाव खेळला.
19 जून रोजी ही दुर्घटना घडली.
मात्र त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जूनलाच केतनने एक खास प्लॅन तयार केला होता. 19 जून हा त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता आणि तो दिवस कायम लक्षात राहावा यासाठी केतन ( Ketan Agrawal ) तिला एक खास सरप्राईज देणार होता. याच सरप्राईजच्या तयारीसाठी तो आपल्या मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शूट करण्याचा प्लॅन होता.
मात्र फोटो काढताना अचानक तो दरीत कोसळला
आणि काही क्षणात सगळं संपलं. घटना घडल्यानंतर स्थानिक ट्रॅकर्स आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जीवाची पर्वा न करता शोध मोहीम सुरू केली. अखेर सुमारे 350 फूट खोल दरीत केतनचा मृतदेह आढळला. यानंतर या प्रकरणात अनेक वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात होऊ लागल्या. केतन ( Ketan Agrawal ) सोबत असलेल्या मित्रांची चौकशी करण्यात आली. तसेच त्याच्या होणाऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनंतर काही नवीन प्रश्न उपस्थित झाले असल्याचं बोललं जात आहे.
मात्र पोलिसांनी अद्याप कोणताही संशयास्पद निष्कर्ष जाहीर केलेला नाही.
सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून अपघात नेमका कसा घडला याचा शोध घेतला जात आहे. महाबळेश्वर मध्ये आपल्या होणाऱ्या पत्नीला खास सरप्राईज देण्याचा केतनचा प्लॅन होता. पण त्या आधीच ट्रेकिंगची आवड असलेल्या केतनने मित्र आणि भावी पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला.
निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा प्लॅन होता.
सकाळी हे सर्वजण लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले. वातावरण अल्हाददायक होतं. गडावर फिरताना ते हत्ती तलावा जवळ आले. तिथून पुढे जाणाऱ्या अरुंद वाटे जवळ खोल दरी होती आणि कोणतंही सुरक्षा रेलिंग नव्हतं. निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी केतन ( Ketan Agrawal ) कड्या जवळ गेला. तिथे फोटो काढण्याचं ठरलं. पण काही क्षणातच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं.
अचानक केतन दरीत कोसळला.
सुरुवातीला तो सेल्फी काढताना पडल्याचं सांगितलं गेलं. मात्र स्थानिकांच्या मते, त्याच्या हातात फोनच नव्हता. त्यामुळे नेमका काय घडलं याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. 19 जूनच्या सकाळी साडे नऊच्या सुमारास केतनची भावी पत्नी घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षिततेच्या… केतनची भावी पत्नी घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकांकडे धावत आली. ती मदतीसाठी आक्रोश करत होती. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
लोणावळा पोलिसांनी स्थानिक रेस्क्यू टीमशी संपर्क साधला.
काही वेळातच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. 350 फूट खोल दरी, घसरडी वाट आणि दाट जंगलामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत कठीण होतं. दोरखंडाच्या साहाय्याने टीमने दरीत उतरण्यास सुरुवात केली. खाली उतरताना निसरड्या वाटेतून मार्ग काढत अखेर रेस्क्यू टीमला केतन ( Ketan Agrawal ) सापडला. तो गंभीर अवस्थेत दरीत पडलेला होता. उंचावरून पडल्याने डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती.
रेस्क्यू टीमने त्याला काळजीपूर्वक स्ट्रेचरवर बांधलं
आणि दरीतून वर आणण्याचं ऑपरेशन सुरू केलं. दुपारी साडेअकराच्या सुमारास केतनला वर आणण्यात आलं. तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. केतनला शोधायला गेलेल्या ट्रॅकर्सना मात्र काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. तो दरीत पडला खरा, पण हा फक्त अपघात होता का, असा प्रश्न उपस्थित झाला. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली.
पण दुसऱ्या दिवशी प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी स्थानिक आणि ट्रॅकर्सच्या मुलाखती समोर आल्या. त्यांनी सांगितलं की घटनास्थळ पाहता हा साधा अपघात वाटत नव्हता. यानंतर पोलिसांनी केतनसोबत आलेल्या मित्रांची आणि त्याच्या भावी पत्नीची चौकशी केली. त्यातून वेगळीच माहिती समोर आली. भावी पत्नीच्या म्हणण्यानुसार, केतन ( Ketan Agrawal ) कड्यावर उभा राहून फोटोसाठी पोज देत होता. ती त्याचे फोटो काढत होती. मोबाईल आणि कॅमेरा सेट करताना ती काही सेकंदांसाठी मागे वळली.
पुन्हा समोर पाहिलं, तेव्हा केतन ( Ketan Agrawal ) तिथे नव्हता.
तो थेट दरीत कोसळला होता. तीव्र वारा, पाया खालून सरकलेला दगड की आणखी काही? या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. काहींनी या प्रकरणाचा संबंध पुण्यातील चर्र्चित पोर्शे कार अपघातातील विशाल अग्रवाल कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं की केतनचे वडील विशाल अग्रवाल आणि पोर्शे प्रकरणातील विशाल अग्रवाल यांचा कोणताही संबंध नाही. तो फक्त नावाचा योगायोग होता.
अनुभवी ट्रॅकर्सच्या माहितीनुसार लोहगडावरील हत्ती तलावाजवळचा कडा अत्यंत धोकादायक आणि निसरडा आहे.
तिथे जोरदार वाऱ्यामुळे अनेकदा तोल जातो. पायाखालची माती किंवा दगड सरकल्यास सावरण्यासाठी कठीण नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही घातपाताचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. अखेर पोलीस तपासातून हे स्पष्ट झालं की हा एक दुर्दैवी अपघात होता. निसर्गाच्या कुशीत फोटो काढण्याचा मोह आणि अतिउत्साह एका कुटुंबाचा, एकुलता एक मुलगा हिरावून घेणारा ठरला. या घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
FAQ
Q1. केतन अग्रवाल कोण होते?
केतन अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे पुत्र होते.
Q2. अपघात कुठे झाला?
हा अपघात पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर झाला.
Q3. केतन अग्रवालचा मृत्यू कसा झाला?
फोटो काढताना तोल जाऊन ते सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळले.
Q4. पोलिस तपासात काय समोर आलं?
प्राथमिक तपासानुसार हा दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले असून घातपाताचे पुरावे आढळले नाहीत.
Q5. लग्न कधी होणार होते?
अपघाताच्या वेळी त्यांच्या लग्नाला अवघे 20 दिवस बाकी होते.
हे पन नक्की वाचा
Should We Give Up Farming? आपण शेती खरंच विकली पाहिजे का?
शेतकरी जगाचा पोशिंदा का? | “जय जवान जय किसान” यामागचा खरा अर्थ