tarun-mulanna-mothya-striya-ka-awadtat आजकालची तरुण मुलं वयाने मोठ्या स्त्रियांकडे का आकर्षित होत आहेत? जाणून घ्या खरी कारणे
काही प्रमाणात हे खरं मानलं जातं की आजकाल काही तरुण मुलं स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांकडे आकर्षक होत चालले आहेत पण हे प्रत्येक मुलाबाबत लागू होत नाही आकर्षण ही गोष्ट व्यक्तीच्या स्वभाव अनुभव मानसिकता संस्कार आणि आयुष्यातील अपेक्षांवरती अवलंबून असते.
समाज बदलत चालला आहे नात्यांमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बलत चालला आहे आणि त्यामुळे अशा नात्यांची चर्चा आज अधिक उघडपणे होताना दिसत आहे. मुळात आजकालची मुले हे करत आहेत हे चुकीच आहे आपण कदाचित हेही म्हणू शकतो की स्त्रियांकडून आजकाल असे व्यवहार जास्त केले जात आहेत. आपण म्हणतो ना टाळी एका हाताने वाजत नाही हे पण थोडंसं तसंच काहीतरी आहे.
चला तर मग आपण या मागची काही कारणे जाणून घेणार आहोत.
सर्वात पहिला मुद्दा म्हटल्यावर ती परिपक्व स्वभाव आणि समजूतदारपणा.
अनेक तरुणांना असं वाटतं की वयाने मोठ्या क्रिया अधिक समजूतदार असतात त्या छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत बसत नाहीत नात्यांमध्ये ठेवतात आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतात समोरच्या व्यक्तीचे मन समजून घेतात आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता आणि भावनिक आधार खूप महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांनाच मिळावा अशी अपेक्षा असते त्यामुळे काही मुलांना अशा स्त्रियांसोबत संवाद साधताना सुरक्षित आरामदायक आणि प्रेमळ वाटतं त्यामुळे मुलं त्यांच्याशी संबंध ठेवायला तयार असतात.
आत्मविश्वास आकर्षित करतो
मोठ्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक दिसून येतो त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतात स्वतःची काळजी घेत असतात स्वतःची ओळख तयार केलेली असते आणि आयुष्यात काय हवंय हे त्यांना स्पष्टपणे माहीत असतं हा आत्मविश्वास अनेक तरुण मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करायला भाग पाडतो काही मुलांना मॅच्युअर पर्सनॅलिटी अधिक प्रभावी वाटते कदाचित यामुळे देखील मुलं अशा स्त्रियांकडे आकर्षित होतात.
भावनिक स्थैर्य
काही तरुण मुलांना त्यांच्या वयाच्या मुलींमध्ये सतत मोड बदलणे असुरक्षितता वाटणे किंवा नात्यांमधील गोंधळ दिसून येणे त्या उलट मोठ्या स्त्रिया भावनिक दृष्ट्या अधिक स्थिर असतात असं अनेकांचे मत आहे त्यामुळे कदाचित मुलांमध्ये स्त्रियांकडे बघण्याची नजर बदलते त्या नात्यांमध्ये स्पष्ट बोलत असतात अपेक्षा उघडपणे सांगत असतात आणि गैरसमज कमीत कमी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माणच करत नाहीत.
अनुभवामुळे येणारी आकर्षकता
अनुभव माणसाला वेगळं व्यक्तिमत्व देतो आयुष्यातील चढ-उतार पाहिलेल्या स्त्रिया अनेकदा अधिक संयमी शांत आणि व्यवहारिक असतात त्या स्वतःची काम स्वतः करण्यात भाग पडलेला असतात किंवा त्यांना दुसऱ्या कोणाचा आधार पाहिजेच नसतो काही मुलांना ही गोष्ट खूप प्रभावी वाटते त्यामुळे त्यांना वाटतं की अशा स्त्रिया आयुष्याबद्दल अधिक वास्तववादी असतील अधिक प्रेमळ असतील आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची पण त्या काळजी घेत असतील कदाचित हेच कारण जे मुलांना सर्वात जास्त आवडतं.
सोशल मीडिया आणि चित्रपटांचा प्रभाव
आजकाल आपण आजच्या काळामध्ये वेब सिरीज चित्रपट सोशल मीडिया यामध्ये वयाने मोठ्या स्त्रिया आणि तरुण मुलांच्या नात्यांचे चित्रण वाढलं आहे त्यामुळे अशा नात्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदललेला आहे यामध्ये जास्त करून त्या मुलांचा व्यवहार बदलत चाललेला आहे जे मुलं स्वतःच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांना पाहण्याचे आधी झालेले आहेत पूर्वी लोक अशा नात्यांबद्दल उघडपणे बोलत नसत पण आता लोक स्वतःच्या भावना अधिक मोकळेपणाने स्वीकारू लागले आहेत आणि सोशल मीडियामुळे हे सर्व जगाला दिसून पण येत आहे.
काळजी घेणारा स्वभाव
काही मोठ्या स्त्रिया नात्यांमध्ये अधिक काळजी करतात. मोठ्या स्त्रिया समोरच्या व्यक्तींची भावनिक गरज ओळखतात आणि आधार देतात. मोठ्या स्त्रिया नात्यात स्थिरता निर्माण करतात. मोठ्या स्त्रिया असे नाते तयार करतात ज्यात समोरच्या व्यक्तीला बाहेर पडू नये असे वाटते. अनेक तरुण मुलांना हा काळजीचा स्वभाव खूप जवळचा वाटतो.
कमी दिखावा आणि स्पष्टपणे बोलणे
अनेक वेळा वयाने मोठ्या स्त्रिया नात्यांमध्ये कमी दिखावा करतात त्यांना सतत इम्प्रेस करण्यासाठी कोणती गोष्ट करावीच असं काही नसतं त्या स्पष्ट बोलतात वेळेची किंमत ओळखतात आणि नातं टिकवण्यासाठी प्रमाणितपणाचा आधार घेतात आणि प्रामाणिकपणाला महत्त्व पण देतात हे अनेक तरुणांना आवडतं.
मानसिक जुळवाजुळव
आकर्षण फक्त सौंदर्य अवलंबून असतं काही मुलांना त्यांच्या विचारांशी जुळणारी आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करणारी व्यक्ती आवडते वयाने मोठ्या स्त्रियांमध्ये अशी मानसिक परिपक्वता अधिकच जाणून येते. कदाचित ही गोष्ट मुलांना जास्त आकर्षित करते.
स्वतंत्र आणि करिअर केंद्रित व्यक्तिमत्व
आज अनेक स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे स्वतःचा करिअर स्वतःची ओळख आणि निर्णय क्षमता यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसून येत आहे काही तरुणांना अशा स्वतंत्र स्त्रिया खूप प्रेरणादायी वाटतात.
नात्यांमध्ये कमी दबाव.
कधी कधी तरुण मुलांना वाटतं की मोठ्या स्त्रिया नात्यांमध्ये अनावश्यक ड्रामा किंवा सततची जात पाणी करत नाहीत त्या समोरच्या व्यक्तीला अधिक स्पेस देतात आणि विश्वासावर मात्र टिकवतात कदाचित ही गोष्ट खूप प्रमाणात खरी आहे. यामुळे त्या स्त्रियांच्या मनातील गोष्टी त्या बोलून तर टाकतात आणि समोरच्याच्या मनातल्या गोष्टी पण काढतात.
जास्त फरक कोणत्या गोष्टींवर दिसतो?
विश्वासावर
आदरावर
समजूतीदार वर
प्रामाणिकपणावर
भावनिक जुळवा जुळवी वर
आर्थिक दृष्ट भक्कमपनावर
केअरिंग स्वभावावर
प्रेमळ बोलण्यावर
पर्सनल स्पेस देण्यावर
वरील गोष्टी मजबूत असतील तर वयाचा फरक मोठा मुद्दा होत नाही. वरील गोष्टी सामान्य मुलीकडून मुलींना मिळाल्यास, मुलींचा व्यवहार त्या मुलींसाठी तसाच राहतो, व वयाने मोठ्या स्त्रियांसाठीही तसाच राहतो.