लग्न झालेल्या स्त्रिया नवऱ्यापासून दूर का जात आहेत? कारणे, सत्य आणि नातं टिकवण्याचे उपाय

लग्न झालेल्या स्त्रिया नवऱ्यापासून दूर का जात आहेत? कारणे, सत्य आणि नातं टिकवण्याचे उपाय . आज-काल असं दिसून येत आहे की लग्न झाल्यानंतर काहीच स्त्रिया नवरापासून मानसिक आणि भावनिक दृष्टा दूर जात आहेत पण या विषयाकडे फक्त स्त्री चुकीची किंवा फक्त परिस्थितीचा अशा एकतर्फ नजरेने पाहून काही उपयोग नाही ना तर तुटतंय ते एका दिवसात नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही गैरसमज दुर्लक्ष दान अपेक्षा संबंधाचा या सर्व गोष्टींमुळे हळूहळू अंतर वाढत जाते आणि कदाचितच ही गोष्ट असते की नवरा बायको आज कालच्या काळामध्ये थोडेसे वेगळे वेगळे होत जात आहेत.

घरात दोन जण असले तरी मन जुळत नसेल तर एकटेपणा वाटतो. याचे मुख्य कारण संवादाचा अभाव आहे. लग्नापूर्वी किंवा सुरुवातीला नवरा बायको खूप बोलत होते, पण काही वर्षांनंतर फक्त “जेवलास का?” “पैसे ठेवले का?” असेच प्रश्न विचारू लागले. नवरा बायको मनात काय चालले आहे, कोणत्या गोष्टीचा त्रास आहे, काय अपेक्षा आहेत हे बोलत नाहीत. संवाद थांबतो. कमी होतं तिथे गैरसमज वाढायला लागतात अनेक वेळा पुरुष दिवसभर बाहेर काम करून थकलेला असतो तर स्त्री घरी मुलं घरची जिम्मेदारी जबाबदारी या तडकलेली असते दोघांनाही वाटतं की माझा त्रास समोरच्याला समजत नाही आणि इथूनच भावनिक अंतर सुरू होतं.

आदराची कमतरता हा दुसरा मोठा कारण आहे. प्रत्येक स्त्रीला पैसा नको, प्रत्येक स्त्रीला मान, आपुलकी आणि प्रत्येक स्त्रीच्या भावना समजून घेणारा साथीदार हवा. प्रत्येक स्त्रीला प्रेम आणि प्रेमाची उब हवी. काही घरांमध्ये विचारलं, पण उत्तर मिळत नाही. विचारलं, पण उत्तर मिळत नाही. सरळ बोलल्यावर ‘तुला काय कळतंय’ असे शब्द प्रत्येक स्त्रीच्या मनात हळूहळू अंतर निर्माण करतात. अंतर वाढल्यावर प्रत्येक स्त्रीचा नवरा थोडा दूर होऊ लागतो. स्त्रियांच्या आयुष्यातही बदल आले आहेत. आज अनेक महिला शिक्षित आहेत, अनेक महिला नोकरी करतात, अनेक महिला स्वतःचे विचार ठेवतात. जर महिलांना फक्त घर सांभाळणारी व्यक्ती म्हणून पाहिले, तर संघर्ष वाढतो. महिलांना देखील स्वतःचा आदर, स्वातंत्र्य आणि ओळख हवी. हवी असतील जी की आज कालच्या काळातील प्रत्येक स्त्री घेतच आहे.

काही वेळा सासरच वातावरण हे कारणीभूत ठरतं सतत मोठ्या माणसांचे टोमणे तुलना प्रत्येक गोष्टीत चूक काढणे या गोष्टीला ही स्त्री मानसिक ग्रस्त थकते नवरा जर त्यावेळी तिच्या बाजूने उभा राहिला नाही तर ती आतून पण एकटी पडल्यासारखी वाटते तसंच काही पुरुषांनाही अनेक समस्या असतात आर्थिकता आणि नोकरीची चिंता जबाबदार यामुळे ते चिडचिडे होतात पण ते कधी भावना व्यक्त करत नाहीत मग घरात भांडण वाढतात यामुळे हा प्रश्न स्त्रियांचाच नाही त्या दोघांचाही असतो.

काही नात्यांमध्ये विश्वास कमी होतो. मोबाईल तपासणे आणि प्रत्येक गोष्टीवर शंका घेणे नातं घटवते. विश्वास नसल्यास प्रेम टिकत नाही. आजच्या काळात सोशल मीडियामुळे लोक इतरांच्या आयुष्याकडे बघून आपल्याशी तुलना करतात. इतरांचा नवरा एखादी गोष्ट करतो, माझा का नाही करतो? इतराची बायको एखादी पद्धत वापरते, माझी बायको का नाही वापरते? या तुलना नात्यात असमानता निर्माण करतात. पण सोशल मीडियावर दिसणारी सर्व माहिती खरी नसते.

मी पाहिलं की व्यक्ती बायको आणि नवरा एकमेकांशी जुळत नसल्यास बायको आणि नवरा यांच्यापासून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी व्यक्ती बायको आणि नवऱ्याच्या वादाकडे पाहून आनंदी वाटतो. कधी कधी बायको आणि नवरा वेगळे होत असताना व्यक्ती बायको आणि नवरा यांचा फायदा घेण्याचा विचार करतो. व्यक्ती बायकोचे काम किंवा नवऱ्याचे काम घेऊन बायको आणि नवरा दोघांमध्ये राग निर्माण करतो. व्यक्ती बायको आणि नवरा दोघांनाही बायको आणि नवरा यांच्यातील विरोध वाढवून एकमेकांविरुद्ध बोलवतो. आणि ही गोष्ट सर्वात आधी नवरा बायकोने समजून घेतली पाहिजे खरं पाहिलं तर बायकोच्या आयुष्यामध्ये नवऱ्या शिवाय मोठं कोणीच नसतं आणि कदाचित नवऱ्याच्या आयुष्यामध्ये पण आपल्या धर्मपत्नीशिवाय दुसरं कोणीच मोठा आणि महत्त्वाचं नसतं.

या सर्व गोष्टींचा विचार करूनच कृपया एकमेकांशी भांडाबोला कारण जर तुम्ही दोघे वेगळे होत आहेत तर कोणाचा तरी नुकसान की होत आहे आणि कोणाचा फायदा पण होत असेलच याची खात्री तर होईलच कारण या जगामध्ये सध्या जे काही होत आहेत ते कोणाच्यातरी फायद्यासाठी किंवा कोणाच्या तरी नुकसानासाठीच होत आहेत कारण प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जर डोक्या होत असेल तर त्याला एक तर स्वतःचा फायदा बघून घ्यायचा असतो.

खाली आम्ही काही कारणे दिली आहेत ज्यामुळे नवरा‑बायकोचे नाते टिकेल आणि एकमेकांतील प्रेम, समज आणि आदर कसे जपता येईल.

आता प्रश्न येतो की हे होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा या गोष्टी होऊ नयेत तुमच्या नवऱ्यासोबत वैयक्तिक तुमच्यासोबत अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा संवाद वाढवा दिवसातून थोडा वेळ फक्त एकमेकांसाठी ठेवावा मोबाईल बाजूला ठेवावा म्हणून बोलणं गरजेचं आहे छोटे छोटे गोष्टी शेअर केल्या पाहिजेत की नातं मजबूत कसं राहील आपलं

दुसरं म्हणजे एकमेकांचा आदर करावा नवरा असो किंवा बायको दोघांनाही भावना असतात मीच बरोबर हा हट्ट सोडणे गरजेचा आहे कधी समोरच्याचा पण ऐकून घ्या समोरच्याला काय बोलायचे समोरच्या मनात काय येते हे पण ऐकून घेण्याचा प्रयत्न करा.

मी लक्षात घेतले आहे की घरकाम आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाटून घेतल्यास नात्यात जवळीक वाढते. पत्नी दिवसभर घरात असली तरी पत्नी थकते. पत्नीचे कामाची कदर करणे खूप महत्त्वाचे आहे.

त्यांनाही नवऱ्यांचा काम समजून घ्यायला हवा प्रत्येक पुरुष भावना बोलून दाखवत नाही त्यामुळे शांतपणे समजून घेणे गरजेचे आहे पुरुषाला घरपण चालवायचे घरातल्या लोकांचा आयुष्य पण चालवायचे बाहेर पण स्वतःला स्थापित करायचे बाहेरच्या लोकांना पण सामोरे जायचे एका प्रकारे पुरुषांनाही त्रास खूप असतो त्यांना एवढंच पाहिजे असतं की बायकोने तरी त्या पुरुषाला सांभाळून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे.

भांडण प्रत्येक घरात होतात पण रागात बोललेले शब्द आयुष्यभर जखम देत असतात त्यामुळे रागाच्या भरात अपमानास्पद बोलणं टाळायला हवं बायको असो किंवा नवरा दोघांनीही एकमेकांसाठी जेवढ्या जिवाळ्याने आहात तेवढ्याच जिवाल्याने प्रेमाने राहा एखादा शब्द जर टोचला आणि तो आयुष्यभर तसाच समोरच्याच्या मनात राहू शकतो याची खात्री करून घ्या.

एकत्र वेळ घालवणं खूप महत्त्वाचा आहे कधी बाहेर फिरायला जा एकत्र जेवण करा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा या गोष्टींना नातं जिवंत ठेवायला मदत करतात.

सासर आणि माहेर या दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा असायला हवा प्रत्येक छोट्या गोष्टी फक्त चेक केल्याने नवरा बायको मध्ये तणाव वाढतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातं जपण्याची इच्छा दोघांकडेही असावी लागते एकट्या व्यक्तीने प्रयत्न सुरू करून नाहीतर टिकत नाही दोघांचीही आपलं नातं महत्त्वाचं आहे असं समजलं पाहिजे असं मनापासून मानलं पाहिजे तेव्हा कुठं नातं टिकून राहतं.

धावपळीच्या जगात पैसा आणि मोबाईलपेक्षा माणुसकी आणि प्रेम जास्त महत्त्वाचे आहेत. एक साधा मनुष्य म्हणून, बघतो की शेवटी माणसाला मोठा घर नाही; शांत मन आणि साथ देणारा नातं माणसाला सुखी ठेवते.

Leave a Reply

Translate »