Raja Shivaji Box Office Collection Day 1: रितेश देशमुखच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास

Raja Shivaji Box Office Collection Day 1: रितेश देशमुखच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास. Raja Shivaji box office collection 

राजा शिवछत्रपती या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धडाकेबाज सुरुवात करत कमावले एवढे पैसे…

१ मे रोजी शिवरायांचा मावळा रितेश देशमुख यांनी साकारलेल्या बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी प्रदर्शित झाला आहे जसं की न्यूज मध्ये किंवा बातम्यांमध्ये आपल्याला कळत होतं की रिलीज व्हायच्या आधीच 120 कोटी खर्च करून बनवलेला हा राजा शिवाजी या चित्रपटाने 193 कोटी रुपयांची कमाई केली होती.

मराठीच्या इतिहासातील हा सर्वात बिग बजेट सिनेमा मानला जात आहे आत्तापर्यंत खूप सिनेमे मराठी जगात मराठी विश्वात येऊन गेले पण एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बनलेला आणि मराठी मातीची नाळ जुळलेली असताना बनवलेला हा सिनेमा सर्वात बिग बजेट सिनेमा मानला जात आहे..

राजा शिवाजी हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र मध्ये 90% स्कीन वरती प्रसारित करण्यात आला होता यामध्ये आज म्हणजे २ मे ला 90% स्क्रीनस पण बुक आहेत आणि ३ मे स्क्रीन सी हाऊसफुल होत चाललेले आहेत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केलेली सर्वाधिक कमाई म्हणजे 13.20 कोटी ही रेकॉर्ड ठरलेली आहे. सर्वजण सहकुटुंब मित्रपरिवार व नातेवाईक यांसोबत हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपट ग्रहांमध्ये गर्दी करत आहेत..

खरंतर छत्रपती शिवरायांवर ती आजपर्यंत अनेक चित्रपट निघाले काही सत्यतेवर आधारित होते काही चुकीच्या तत्त्वावर पण होते. पण महाराष्ट्राच्या जनतेला स्वाभिमान व अस्मिता असलेल्या राजांच्या प्रत्येक सिनेमा सुपरहिट झाला होता. आपला सिनेमाही प्रदर्शित झाला आहे आपण त्यात बहुतांश सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा सिनेमा खूपच चांगला आहे असं मत रितेश देशमुख यांनी मांडल आहे, या सिनेमातील प्रत्येक घडामोडी प्रत्येक युद्ध प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप लक्ष दिलेले आहे आणि आमच्या कष्टांचे फळ म्हणजेच हा सिनेमा आहे.

पहिल्या दिवशी राजा शिवाजी या चित्रपटाने किती कोटींची गर्जना केली चला जाणून घेऊयात,

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार राजा शिवाजीने रिलीज च्या पहिल्या दिवशी तब्बल 13.35 कोटींची कमाई केली यामध्ये मराठी वर्जन मधून सुमारे 8 कोटी नेट कलेक्शन झालं मराठी चित्रपटासाठी पहिल्या दिवशी एवढी कमाई ऐतिहासिक मानली जात आहे फक्त 1941 शो मधून चित्रपटाने मार्केटमध्ये स्वतःची कहाणी निर्माण केली आहे आणि यासाठीच याने प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचली…

ऍडव्हान्स बुकिंग मध्ये या सिनेमाने किती रुपये कमावले होते,

रिलीज पूर्वी या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मार्फत 5.15 कोटी ग्रॉस कमावून मोठा विक्रम केला होता. त्यापैकी मराठी वर्जन मधून अंदाजे 4 कोटी रुपयांची नेट ऍडव्हान्स बुकिंग झालेली होती त्यामुळे पहिल्याच दिवसाचे दमदार कमाई यथोचित होणारच होती हे स्पष्ट झालेलं होतं.

मोठमोठ्या चित्रपटांना ही टाकले मागे,

जसं की मराठी माणसांना ठाऊक आहे सैराट आणि टाइमपास 2 हे मराठीमध्ये खूप गाजलेले आणि नावाजलेले चित्रपट आहेत या चित्रपटांची कमाई ही जोरदार होती आणि यांची नेट कलेक्शन ही जोरदार झालेली होती पण राजा शिवाजी या चित्रपटाने या दोन्ही चित्रपटांना पहिल्याच दिवशी ओपनिंग च्या दिवशी होणाऱ्या कमाई मध्ये मागे टाकले आहे आणि आज तर दुसराच दिवस असल्यामुळे इथून पुढची कमाई तर किती असू शकते आपण याचा अंदाज आपण नाही लावू शकत.

आजपर्यंत आपण मराठी लोकांना हिंदी सिनेमांमध्ये काम करताना पाहिलं होतं पण आज या चित्रपटातल्या स्टार कास्ट यांना आपण हिंदी सिनेमा मधील मोठमोठ्या व्यक्तींना आपल्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये काम करताना बघणार आहोत यामध्ये आपण जर बघितलं तर संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, अमोल गुप्ते, आणि जेनेलिया देशमुख यांसोबत सलमान खान ही या चित्रपटामध्ये केमिओ करत आहे. यासोबतच हा चित्रपट मराठी माणसांसाठी एक स्वाभिमानास्पद चित्रपट बनत आहे.

Leave a Reply

Translate »