मध्यप्रदेशांमधून हृदय द्रावक घटना समोर आली आहे, मृत्यूच्या क्षणी ही मातेने बाळाला कुशीत घेतलेले होते

मध्यप्रदेशांमधून हृदय द्रावक घटना समोर आली आहे, मृत्यूच्या क्षणी ही मातेने बाळाला कुशीत घेतलेले होते. 

मध्यप्रदेश मध्ये पाण्यात बोट उलटण्याने भीषण दुर्घटना घडली या घटनेत मातेचा तर मृत्यू झाला पण शेवटच्या क्षणापर्यंत तिने आपल्या चिमुरड्या बाळाला घट्ट कुशीत धरून ठेवले होते. बचाव पथकाला मिळालेले हे दृश्य पाहून सर्वजण भाऊक झाले आणि काहींच्या तर डोळ्यात पाणी पण आले. आईच्या प्रेमाचा हा सर्वोच्च त्याग संपूर्ण परिसराला हादरवून गेला. 

या घटनेनंतर आता परिसरात खळबळ उडाली आहे.  सगळीकडे जिथे कस्टमर घेऊन जाण्यासाठी जे क्रूज शिप असतात त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली असते, तिथे सेफ्टी पण पाहिजे फक्त लाईफ जॅकेट देऊन काय फायदा. वेगळे काय तर करायला पाहिजे. अशा क्रूज शिप्स वरती कारवाई करायला पाहिजे अशी मागणी तेथील रहिवासी करत आहेत. ही घटना नक्कीच त्या बोट मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवल्यामुळे झाली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

मागच्या महिन्यात कल्याण मुरबाड रोडवरती इको चालक यांच्या चुकीमुळे व रोडवर रस्त्यांच्या कामामुळे कुठल्याही सूचनाफलक नसल्यामुळे 11 नाहक बळी गेलेत. देशात राज्यात अनेक सार्वजनिक व पर्यटन ठिकाणी सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे अशे निष्पाप लोकांना आपले जीव गमाववे लागत आहेत. आपण सर्वजण अपघात झाल्यानंतर फक्त हळहळ व्यक्त करतो पण असे  लाखो अपघात आजही घडत आहेत.

खर जर पाहिलं तर एका आईचं प्रेम याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की आई आणि बाळ मृत्यूच्या दारात असूनही दोघेणीही एकमेकांची साथ सोडली नाही खास करून आईने, आपण म्हणतो ना जगामध्ये स्वतःच बाळ एका साईटला आणि पूर्ण जग एका साईडला. हा काहीसा असाच अनुभव आहे कारण आईने स्वतः मृत्यूची झुंज देत असताना पण बाळाची साथ बाळाला स्वतःपासून दूर केलंच नाही. तिने यथोचित प्रयत्न केले असतील त्या मुलाला आपल्या बाळाला वाचवण्याचे पण देवाला काही वेगळेच मंजूर होते त्याने आईसोबत त्या बाळाला घेऊन जाणे बेहतर समजले असेल..

आता या सर्व प्रकरणानंतर एक गोष्ट लक्षात येत आहे की लाईफ जॅकेट असेल तरीपण माणूस कसा काय बुडू कसा शकतो आणि जर बुडून त्या माणसाचा मृत्यू होत असेल तर,  एक तर लाईफ जॅकेट खराब असेल किंवा ते योग्य पद्धतीने वापरण्याचे निर्देश त्यांना दिलेले नसतील, बऱ्याच वेळी व्यक्तींना आपापल्या साईचे लाईफ ब्रॅकेट मिळायला पाहिजेत ते कदाचित वयोगटा मार्फत किंवा वजन मार्फत वेगवेगळे केले जाऊ शकतात. यावर त्या लाईफ जॅकेटची कार्यक्षमता सिद्ध होत असते. कदाचित वयानुसार किंवा वजनानुसार जर चुकीचं लाइफ जॅकेट घालण्यात आलं तर कदाचित अशा घटना जास्त होऊ शकतात. 

लाईक जॅकेट नेहमी शरीराच्या आकाराचे आणि योग्य प्रकारचे घट्ट बांधलेले असावे मुलांसाठी नेहमी कॉलर असलेले आणि मानेला आधार देणारे हाय क्वालिटी जॅकेट वापरावे. जेणेकरून या लाईफ जॅकेट मधून तुमचा जीव सुखरूपपणे पाण्यावरती तरंगत राहण्याची क्षमता दिसून येते. लाईफ जॅकेटचा उपयोग जास्त करून मोठमोठ्या नाविक जहाजांवरती आणि पर्यटन स्थळी केलाच जातो, जिथे येणे जाण्यासाठी तेथील नागरिक हे जहाजंवरती आधारित असतात. 

वरील घटना मन हेलावून टाकणारी आहे पण तेथील नागरिकांनी किंवा त्या लोकांनी जे लोक या व्यवसायासंबंधी आहेत किंवा या कामासंबंधी आहेत या लोकांनी कृपया करून काळजी घेणे गरजेचे. कारण जर यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवित हानी होत असेल तर तो फक्त एक जीव जात नसतो तो कित्येक लोकांची स्वप्न कित्येक लोकांचा आधार कित्येक लोकांचं प्रेम या अशा अपघातांमधून वेगळं केलं जातं. 

 

Leave a Reply

Translate »