Meta Paid Subscription Plans: Facebook, Instagram आणि WhatsApp आता होणार सशुल्क? जाणून घ्या संपूर्ण माहिती. Meta ने Facebook, Instagram आणि WhatsApp साठी सशुल्क सदस्यता योजना सुरू केल्या आहेत. या बातमीने जगभरातले वापरकर्ते धूपले आहेत कारण इतके दिवस या सेवा मोफतच मिळत होत्या, पण आता काही खास फीचर्स आणि सुविधा वापरायच्या असतील, तर शुल्क द्यावा लागणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे 10वे आमरण उपोषण! Manoj Jarange Patil Hunger Strike!आंदोलनाचा संपूर्ण इतिहास एका नजरेत
Meta असं म्हणते की हा बदल दोन कारणांसाठी आहेत. जाहिरातांवर कंपनीचं अवलंबित्व कमी करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे वापरकर्त्यांना जास्त गोपनीयता आणि जाहिरातमुक्त अनुभव द्यायचा आहे. विशेषतः युरोपातल्या डेटा गोपनीयतेच्या नियमांमुळे Meta ला हा निर्णय घ्यावा लागला.
Facebook आणि Instagram ला सशुल्क प्लान घेतल्यावर Ad-Free फीड मिळू शकतो. म्हणजे त्यावर जाहिराती अजून कमी, किंवा नाहीच दिसतील. शिवाय, प्रीमियम फीचर्स, अधिक सुरक्षा, ठळक संरक्षण अशा गोष्टी मिळू शकतात.
WhatsApp ची गोष्ट वेगळी आहे. सामान्य वापरकर्त्यांसाठी WhatsApp अजूनही मोफत आहे. पण कंपन्यांसाठी आणि बिझनेस यूजर्ससाठी, WhatsApp Business मध्ये प्रीमियम सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. यात ऑटोमेशन, प्रगत ग्राहक सेवा टूल्स, अनालिटिक्स आणि फिचर्स असतात पण त्यासाठी शुल्क द्यावं लागतं.
Mark Zuckerberg ने आधीच स्पष्ट केलं आहे की Meta वेगळे महसूल स्रोत शोधणार आहे. सशुल्क सदस्यता योजना हा त्याच धोरणाचा एक भाग आहे. यामुळे कंपनीला फक्त जाहिरातींवर अवलंबून राहावं लागणार नाही.
या बदलावर काहींनी स्वागत केलं, तर काहींना पैसे देऊन सोशल मीडिया वापरणं पटत नाही. तज्ज्ञांचा अंदाज असा आहे कि Meta ने सुरू केलेल्या या नव्या धोरणामुळे इतर कंपन्या देखील अशा सदस्यता योजना आणू शकतात. एक गोष्ट मात्र ठरलेली—Facebook, Instagram आणि WhatsApp चा साधा वापर अजूनही बहुतेकांसाठी मोफतच असेल. पण, अधिक सुविधा, सुरक्षा किंवा Ad-Free अनुभव हवे असल्यास, सदस्यता घेणं भाग पडणारच. Social media वापरायची पद्धत बदलायला लागली आहे, आणि हे बदल भविष्यात आणखी मोठं रूप घेतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.
#Meta #Facebook #Instagram #WhatsApp #MetaSubscription #PaidSubscription #MetaNews #TechNews #SocialMedia #DigitalNews #MarathiNews #Technology #MarkZuckerberg #FacebookPremium #InstagramPremium #WhatsAppBusiness #OnlinePrivacy #TrendingNews #FASTMARATHI #MarathiTechNews