Jet Fuel Information in Marathi. जेट इंधन म्हणजे काय? Jet Fuel / ATF ची संपूर्ण माहिती, प्रकार, किंमत आणि उपयोग. जेट इंधन म्हणजे विमानांच्या इंजिनसाठी वापरलं जाणारं खास इंधन. हे साधं केरोसीन सारख नसून, अत्यंत शुद्ध केरोसीनवर प्रक्रिया करून बनवलेलं असतं. तुम्ही जेट, प्रवासी विमान, मालवाहू विमान, लष्करी विमान किंवा काही हेलिकॉप्टर पाहिले असतील, त्यात हे इंधन वापरलं जातं. जेट इंधन थंड, उंच आणि वेगवान उड्डाणासाठी तयार केलं गेलंय.
1 June New Rules जूनपासून मोठे बदल! LPG, UPI, PAN, ATM Rules आणि FD Interest वर होणार थेट परिणाम
जेट इंधनाचे मुख्य प्रकार तीन असतात जे कि खालील प्रमाणे आहेत,
1. Jet A — अमेरिका मध्ये सर्वात जास्त वापरलं जातं. तिथे हे गोठण्याचं तापमान -40°C पर्यंत असत.
2. Jet A-1 — जगभरात मूलतः हेच वापरलं जातं, भारतातही याच गोठण्याचं तापमान . -47°C पर्यंत असत.
3. Jet B — फार थंड प्रदेशात वापरतात. अगदी कमी तापमानातही इंधन काम करतं. आणि लवकर गोठत नाही.
जेट इंधनाची काही फायदे.
– ऊर्जा जोरदार मिळते
– तापमान कमी असलं तरी द्रवरूप राहतं
– सुरक्षित आणि स्थिर पेटते
– इंजिनला व्यवस्थित असत
– लांब प्रवासासाठी खरोखर उपयोगी पडत
जेट इंधन कसं तयार होतं?
कच्च्या तेलावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया होते. त्यातला केरोसीन वेगळा केला जातो आणि एक-एक स्पेशल रासायनिक घटक मिसळून जेट इंधन तयार होतं. अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-फ्रीज वगैरे मिळतात, म्हणजे इंधन टिकतं आणि थंडीतही वापरू शकता.
याची किंमत जा बघितली तर कायमच वरखाली. जेट इंधन ( भारतात ATF: Aviation Turbine Fuel ) ची साधारण किंमत ₹85 ते ₹110 प्रती लिटर असते, पण डॉलरचा भाव, जागतिक तेल बाजार, करं, वाहतूक खर्च सगळ्याचा यात प्रभाव असतो. विमान कंपन्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात त्यामुळे त्यांना वेगळा दर मिळतो.
एक मोठं प्रवासी विमान तासभर उड्डाणात 2500 ते 4000 लिटर जेट इंधन वापरू शकतं. या इंधनचा मुख्वाय वापर काय तर आपण बघू शकतो कि ते इंधन प्रवासी विमाने, मालवाहू विमाने, लष्करी जेट्स, हेलिकॉप्टर्स, खासगी जेट्स… जिथे वेग आणि शक्ती लागते, तिथे हेच इंधन वापरले जाते.
एकंदरीत काय तर, जेट इंधन हे विमान वाहतुकी साठी मुख्य आधार आहे. Jet A-1 किंवा ATF म्हणजेच विमानांना सुरक्षित, वेगवान आणि लांब उड्डाणासाठी आवश्यक असणं इंधन. त्याचा भाव सतत बदलतो आणि तेल बाजारावर अवलंबून असतो. विमान उद्योग वाढताच जेट इंधनाचं महत्त्व आणि भाव पन वाढतो. जगभरात विमानांना गती, सुरक्षितता, आणि कामे लवकर मिळवण्यासाठी हेच इंधन वापरलं जातं.
#JetFuel #ATF #AviationFuel #AircraftFuel #JetA1 #AviationIndustry #FlightFuel #AviationMarathi #JetFuelMarathi #AircraftTechnology #विमानइंधन #जेटइंधन #ATFPrice #AviationNews #MarathiNews