गुजरात हत्याकांड: पत्नीने बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचा केला खून | Marathi Crime News

गुजरात हत्याकांड: पत्नीने बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचा केला खून | Marathi Crime News. ऑक्टोबर मध्ये गुजरातच्या एका कॅनलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ह्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तीन दिवस वाट पाहिल्यानंतर सुद्धा मृतदेह ताब्यात घ्यायला कोणीच येत नसल्यानं मृतदेहावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आणि ही केस तिथेच बंद झाली. पण सहा महिन्यांनी पोलिसांना खबऱ्याकडून एक टीप मिळाली. कॅनलमध्ये सापडलेला मृतदेह शांतीगिरी नावाच्या व्यक्तीचा होता. आणि त्याचा खून करण्यात आला होता. मग तपास झाला. आणि तब्बल सात महिन्यांनी १८ मे ला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. शांतीगिरीच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी त्याचीच बायको जागृतीला अटक केली. खरं तर शांतीगिरी आणि जागृतीचं हे दुसरं लग्न होतं. पण नंतर जागृतीचा जीव तिसऱ्या वर जडला.

तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. म्हणून तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं शांतीगिरीचा काटा काढल्याचं तपासात समोर आलंय. आता हे प्रकरण वरवर वाटतं तेवढं सोपं नाहीये. ५० वर्षांच्या जागृतीनं शांतीगिरीला मारण्यासाठी केलेलं प्लॅनिंग खतरनाक होतं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सुद्धा ही हत्या आहे हे समजू शकलं नाही. जागृतीनं आपल्या नवऱ्याला कसं संपवलं? त्यात तिच्या बॉयफ्रेंडचा रोल काय होता? ओपन अँड शट म्हणून बंद झालेली ही केस पोलिसांनी कशी सोडवली? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. ऑक्टोबर ला गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धरांगधरा धरा सुरेंद्रनगर रोडवर एका कॅनलमध्ये एक मृतदेह गावकऱ्यांना दिसला.

गावकऱ्यांनी सुरेंद्रनगर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. आजूबाजूच्या पोलीस स्टेशन्समध्ये कुणी बेपत्ता असल्याची तक्रारी तपासण्यात आल्या. मृतदेह ७२ तास ठेवण्यात आला. पण ओळख पटवायला कोणीच आलं नाही. शेवटी पोलिसांनी बेवारस मृत्यूची नोंद करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पुढे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे केस तिथेच बंद झाली. पण सहा महिन्यांनी मार्च मध्ये अहमदाबादच्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या एका खबऱ्यानं सुरेंद्रनगर पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. ऑक्टोबर महिन्यात कॅनलमध्ये सापडलेला मृतदेह हा शांतीगिरी गोस्वामीचा होता आणि त्याची हत्या करण्यात आली होती. नंतर हे प्रकरण क्राईम ब्रांचनं हातात घेतलं आणि या प्रकरणात धक्कादायक खुलासे व्हायला लागले.

सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या ध्रानगधरा शहरात सुखदेव गिरी गोस्वामी आणि त्याचा मोठा भाऊ शांतीगिरी गोस्वामी हे दोन भाऊ आपल्या कुटुंबासोबत राहायचे. दोघांची ही लग्नं झाली होती आणि त्यांना दोन दोन मुलं सुद्धा होती. पण काही वर्षांनी लहान भाऊ सुखदेव गिरीची बायको जागृती आणि त्याचा मोठा भाऊ शांतीगिरी यांच्यात जवळीक वाढली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही एकाच घरात असल्यामुळे त्यांच्या या संबंधांबद्दल घरातल्या इतरांना कळलं. सुखदेव गिरी आणि शांतीगिरीच्या बायकोनं त्यांना विरोध केला पण दोघांनीही आपल्या कुटुंबाला सोडून पळून जाऊन दुसरं लग्न केलं आणि सोळली गावात राहायला लागले. शांतीगिरी ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्यामुळं तो कामानिमित्त दिवस गावाबाहेरच असायचा. सुरुवातीला काही महिने सगळं काही सुरळीत होतं पण नंतरनंतर जागृतीचं खरं रूप समोर यायला लागलं. शांतीगिरीच्या घराबाहेर असण्याचा तिने फायदा घेतला आणि गावातल्या इतर तरुणांशी लगट केली. शांतीगिरी बाहेर गेला की ती त्यांना घरी बोलवायची, तर कधीकधी ती बाहेर जाऊन त्यांना भेटायची. शांतीगिरीच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत कांतिलाल उर्फ भरत साबरिया नावाचा त्याचा मित्र होता. शांतीगिरीनं त्याला आपल्या खोली शेजारीच खोली मिळवून दिली होती. भरत शांतीगिरीच्या घराजवळ राहू लागला. या दोघांची ड्युटी आळीपाळीनं लागायची. यादरम्यान जागृती आणि भरतची ओळख वाढली. हळूहळू त्यानं जागृतीच्या घरी येणं जाणं वाढवलं आणि दोघांचेही प्रेमसंबंध सुरू झाले. शांतीगिरी कामावर गेल्यावर भरत राजरोसपणे जागृतीच्या घरी यायचा.

जागृतीचं भरतवर विशेष प्रेम होतं. काही दिवसांनी दोघांनीही सोबत राहायचं ठरवलं. पण यामध्ये मुख्य अडथळा होता तो शांतीगिरीचा. एक दिवस शांतीगिरीला जागृती आणि भरतच्या संबंधांबद्दल कळलं. मग दोघांमध्ये नेहमी भांडणं व्हायला लागली. जागृतीला काहीही करून भरत सोबत राहायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून एक निर्णय घेतला. शांतीगिरीला आपल्या वाटेतून कायमचं बाजूला करण्याचा. यासाठी भरतनं त्याचा मित्र युनूस मेनन या सराईत गुंडाला हजारांची सुपारी दिली. ठरल्याप्रमाणं शांतीगिरीला संपवण्यासाठी एका रात्री युनूस शांतीगिरीच्या घरात शिरला. पण भरत प्रमाणेच शांतीगिरी हा सुद्धा युनूसचा मित्रच होता. मोठ्या हिंमतीनं तो मित्राची हत्या करायला गेला पण शांतीगिरीला झोपलेल्या अवस्थेत बघून त्याला मारण्याची त्याची हिंमत झाली नाही. एकीकडं पैसा होता तर दुसरीकडं मित्र. मग युनूसनं इथे एक चाल खेळली. शांतीगिरी अशा पद्धतीनं झोपला होता की पाहणाऱ्याला तो मेलाय असंच वाटत होतं. युनूसनं त्याचा तशाच अवस्थेत फोटो काढला आणि जागृतीला पाठवून काम झाल्याचं कळवलं. इकडे फोटो बघून जागृती आणि भरत खुश झाले. आणि कळवलं. इकडे फोटो बघून जागृती आणि भरत खुश झाले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे युनूसला ताबडतोब 25000 देऊन टाकले. दुसऱ्या दिवशी जागृती आणि भरत मोठ्या आनंदानं शांतीगिरीच्या खोलीत आले. पण त्यांना मोठा धक्का बसला. ज्याच्या हत्येसाठी त्यांनी 25000 मोजले, तो शांतीगिरी त्यांच्यासमोर चक्क चहा पित बसला होता.

युनूसनं आपल्याला फसवले हे त्यांच्या लक्षात आलं. पण शांतीगिरीला संपवण्याचा विचार दोघांच्याही डोक्यातून जात नव्हता. जागृती आणि शांतीगिरी ह्यांच्यातली भांडणं दिवसेंदिवस वाढायला लागली. तो घरी असला की तिला बाहेर जाऊ देत नव्हता. एकमेकांना भेटता येत नाही, म्हणून भरत आणि जागृतीची चिडचिड व्हायची. शेवटी आता आपणच शांतीगिरीचा काटा काढायचा असं त्यांनी ठरवलं. 7 ऑक्टोबर 2025 ला शांतीगिरी कामावरून खोलीवर आला आणि जेवण करून झोपला. त्यानंतर जागृतीनं भरतला बोलवून घेतलं. मग दोघांनी एक जाड उशी घेऊन शांतीगिरीच्या तोंडावर दाबून धरली. जीव वाचवण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण दोघांनीही त्याला ती संधीच दिली नाही. थोड्याच वेळात शांतीगिरीचा मृत्यू झाला. आता शांतीगिरीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचंही त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. त्यासाठी जागृतीनं तिचा गावातला दुसरा बॉयफ्रेंड दीपकला फोन करून मदतीसाठी बोलवून घेतलं. हा दीपक तिच्या प्रेमात फार वेडा झालेला होता. जेव्हा शांतीगिरी आणि भरत दोघेही कामावर असायचे, तेव्हा जागृती या दीपकलाच घरी बोलवायची. आता विषय प्रेमाचा असल्यानं दीपकनं गावातला मित्र ललितला इमर्जन्सी असल्याचं सांगून त्याची इको गाडी आणली. नंतर तिघांनी मिळून शांतीगिरीचा मृतदेह गाडीतून कॅनलवर नेला आणि वाहत्या पाण्यात सोडून दिला.

दोन दिवसांनी मृतदेह राजपूर गावात सापडल्याचं जागृती आणि भरतला कळलं. पण त्यांनी मुद्दामून त्याकडे दुर्लक्ष केलं. जागृतीनं परिसरात अफवा पसरवली की शांतीगिरीला दुसऱ्या शहरात काम मिळालंय आणि तो आता तिथेच राहतोय. एक-दोन महिने झाल्यावरसुद्धा शांतीगिरीबद्दल कुणीच विचारत नसल्यानं, जागृती आणि भरत निवांत झाले आणि ठरल्यानुसार एकत्र नवरा-बायकोसारखे राहायला लागले. पण तरीही जागृतीची प्रेमप्रकरणं थांबली नाहीत. भरत कामानिमित्त बाहेर गेला की ती दीपकला भेटायला बोलवायची. दोन वेळा संसार मोडुन आणि एक खून करून जागृतीचं सगळं पद्धतशीर सुरू होतं. पण क्राईम ब्रांचला मिळालेल्या या टीपनं तिचा भांडाफोड झाला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मार्च 2026 ते मे 2026 असे दोन महिने तपास केला. दीपक आणि इको गाडीवाला, त्याचा मित्र ललित ह्यांना ताब्यात घेऊन, त्यांची चौकशी केली. शेजाऱ्यांशी बोलून अजून माहिती गोळा केली. शांतीगिरी, भरत, जागृतीचे कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन्स तपासले. सगळे पुरावे हाती लागल्यावर 18 मे 2026 ला क्राईम ब्रांचनं भरत आणि जागृतीला अटक केली. दोघांनीही शांतीगिरीच्या खुनाची कबुली दिली.

सोबतच जागृतीनं तिचे आणखी चार ते पाच जणांसोबत संबंध असल्याचंही कबूल केलं. न्यायालयानं जागृती, भरत, दीपक आणि ललित ह्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील चौकशी सुरू आहे. पण, तब्बल सात महिन्यांनी या प्रकरणाचा खुलासा झाल्यानं सगळीकडे चर्चा होते ती जागृती आणि भरतच्या प्रेमसंबंधांची आणि दोघांनी मिळून तिसऱ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केलेल्या शांतीगिरीच्या खुनाची. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Translate »