Cockroach Janata Party Marathi News | कॉकरोच जनता पार्टीची संपूर्ण माहिती

Cockroach Janata Party Marathi News | कॉकरोच जनता पार्टीची संपूर्ण माहिती. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला, तर काय होतं, याचा प्रत्यय एका चळवळीतनं आलाय.

या चळवळीत कोणी रस्त्यावर उतरलं नाही, कुठेही आंदोलन केलं नाही, तरी त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. डिजिटल प्लॅटफॉर्मवर उभी राहिलेली चळवळ नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊया. देशात आणखी एका पक्षाची एंट्री! नव्या पक्षाचं नेतृत्व देशातील तरुण करणार.

काय आहेत नव्या पक्षाच्या स्थापनेमागील कारणं? आम्ही बोलतोय सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टी बद्दल.

सुखमारी से! आझादी! हा भेदभाव से! आझादी!
हा पक्षवाद से! आझादी! हम लेके रहेंगे! आझादी!
तुम कुछ भी कर लो! आझादी!

कॉकरोच जनता पार्टी, हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. नव्याने उदयाला आलेला हा पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो धुमाकूळ घालतोय. अवघ्या काही तासातच पक्षाची सदस्य संख्या ही 70 हजारांच्याही वर गेली आहे. तर काहींनी सदस्यत्व न घेता या पक्षाच्या अकाउंटला फॉलो करत पाठिंबा दर्शवलाय. पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या आता मिलियन्सच्या घरात आहे. 3 ते 4 दिवसात Instagram वर 18 मिलियन फॉलोअर्स झाले, मात्र या पक्षाची स्थापना झाली तरी कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

त्याचं झालं असं, काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश, सूर्यकांतांनी देशातील बेरोजगारांना कॉकरोच म्हटल्याचं एक विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. सर्व स्तरातून याबाबत आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर, आपलं विधान हे बोगस पदवीधारकांसाठी असल्याचं स्पष्टीकरणही सरन्यायाधीशांनी दिलं.

चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ने कहा था की बेरोजगार जो युवा है कही न कही कॉकरोच है. कॉकरोच की तुलना कॉकरोच ही है. और कॉकरोच आसानी से मरता नहीं है आपको पता है? कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में है सब देश के तो क्या होगा आपको भी पता है?

मात्र तरुणांचा रोष ओसरला नाही आणि त्याच रोषतून अभिजीत दिपके या तरुणानं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाची अधिकृत वेबसाईट काढत जाहीरनामा ही प्रसिद्ध केला. मात्र पक्षाचा सदस्य होण्यासाठी काही अटीही ठेवल्यात. काय आहेत अटी? पाहूयात.

बेरोजगार असणं आवश्यक,
आळशी असणं गरजेचं आहे,
दिवसातील कमीत कमी 11 तास सोशल मीडियावर घालवायला हवेत,
आक्रमकपणे तुमच्या मागण्या मांडता यायला हव्यात.

या अटींची पूर्तता केली, तरच तुम्ही पक्षाचे सदस्य होऊ शकता. पक्षाच्या माध्यमातून तरुणांच्या समस्या मांडण्याचं काम केलं जातंय. आता कॉकरोच जनता पार्टीचे महाराष्ट्र, नागपूर, पुणेसह अन्य अकाउंट्स चालू केले जात आहेत. सरन्यायाधीशांनी आपल्याला कॉकरोच संबोधल्याच्या रागातून अनेकांनी पक्षात प्रवेश केला, मात्र काहींनी या सगळ्याला पोरखेळ समजून त्यावर टीकाही केली आहे, पण तुमचं मत काय आहे, तुम्हाला नक्की या विषयाबद्दल काय वाटत आहे की हा विषय किती दिवस चालेल किंवा किती पुढे जाईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Translate »