NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! निवृत्त शिक्षकांनीच लीक केले प्रश्न?

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा! निवृत्त शिक्षकांनीच लीक केले प्रश्न?

आता नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणातला मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि त्याचे साथदार मनीषा मांद्रे यांच्या वळणाचं आता अजून मोठं पर्दाफाश झालंय कारण हे दोन निवृत्त शिक्षक हे नीट परीक्षेचे पेपर सेटर होते हे त्यांनीच सेट केलेले होते आणि नंतर त्यांनी प्रश्नांच्या लीक केल्यामुळे नीट परीक्षेचा पेपर फुटलाय आणि नंतर केंद्र सरकार नीट परीक्षा कॅन्सल करूनी झाली आणि नंतर या सगळ्या प्रकरणात हे दोन्ही आरोपींनी सीबीआयच्या अटकेत असताना आज द इंडियन एक्स्प्रेसने याबद्दल विचारलेलं आणि हे दोन मुख्य आरोपींनी पेपर लीक केलेले होते त्यांच्या पेपरातील प्रश्न शिक्षण विभागात ट्रान्सलेट करून मुलांपर्यंत पोहोचले पोहोचवले.

अशा सूत्रांची माहिती एक प्रकारे सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. ह्याच्यामध्ये काय झालंय एक प्रकारे? तर जे जे प्रश्न पेपर सेटर म्हणून मनीषा मांद्रे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांनी एनटीए ला पुरवलेले होते, तेच प्रश्न त्यांनी खाजगी क्लासेस घेतले त्यांच्या घरी, काही विशिष्ट मुलांना किंवा काही खास मुलांना त्यांनी एक प्रकारे ह्या प्रश्नांची माहिती दिलेली होती, आणि ह्या हे प्रश्न पुरवताना त्यांनी प्रश्न ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करून दिलेलं होतं.

आता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला जर नीट चा पेपर द्यायचा असेल, तर हिंदी आणि इंग्रजी सोबतच तुम्हाला काही प्रादेशिक भाषामध्ये सुद्धा हा पेपर देता येऊ शकतो, त्यामुळे त्या संबंधित विद्यार्थ्यांना या दोन्ही आरोपींनी मराठीमध्येच प्रश्न दिले होते का, अशा प्रकारची शंका आता निर्माण झालेली आहे आणि या प्रकरणाचा उलगडा हा तपासातून होणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांद्रे या दोघांच्या तपासामध्ये सुद्धा आता ही महत्त्वाच्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. परंतु यांनी काय केलेलं होतं?

पेपर सेट केल्यावर काही तरहचे खास प्रश्न आहेत, त्या ट्रान्सलेशन केले आणि एक तर वाद झाला की सुरुवातीपासून त्यांनी त्या प्रश्नावरती बोलावलंय की, त्यांनी काही खास किंवा नक्की एकटीं विद्यार्थी त्यांच्या घरी बोलावले आणि या सर्व प्रकरणात त्यांनी त्यांनी प्रश्न पुरवले. आता सर्वात खास गोष्ट काय आहे? या दोन्ही आरोपींनी कशासाठी केलं? तर सर्वात खास गोष्ट काय आहे की पि.व्ही. कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात सव्वीस वर्ष रसायनशास्त्र विषय शिकवून निवृत्त झालेला प्राध्यापक होता.

तर मनीषा मांद्रे ही मॉडर्न कॉलेजमध्ये तीस ती सुद्धा तिथे एक प्रकारे निवृत्त झालेली होती आणि दोन्ही शिक्षक एनटीए खाली काम करत होते. आता ह्यांनी जे प्रश्नपत्रिका लीक केलेली होती किंवा जे प्रश्न लीक केलेले होते, त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि बायोलॉजी या दोन विषयाचे या दोन विषयांच्या संदर्भातले प्रश्न हे ट्रान्सलेट करून लीक केलेले होते. आता हे का केलं त्यांनी? तर आता मी ज्या पद्धतीने सांगतोय की कुलकर्णी निवृत्त झाल्यानंतर त्याने स्वतःचे क्लासेस सुरू केलेले होते.

सुरुवातीचा काही काळ त्याने आरसीसी क्लासेस म्हणजे जो आरोपी आता अटकेत आहे, त्या शिवराय मोटेगावकरच्या क्लासमध्ये सुद्धा कुलकर्णीने शिकवलेलं होतं, एक प्रकारे त्याची ही खुमखुमी होतीच की मला सुद्धा क्लासेस घ्यायचे आहे आणि म्हणून त्याने काय केलं की तो पुण्यात स्थायिक झाला पण त्याने लातूरमध्ये त्याचे क्लासेस हे सुरू ठेवलेले होते. त्यामुळे आपल्या मुलांपर्यंत हे लीक झालेले प्रश्न पोहोचवायचे आणि आपला रिझल्ट वाढवायचा आणि त्यातून एक प्रकारे व्यावसायिक जी स्पर्धा आहे क्लासेस मधली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कुलकर्णी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, अशी सुद्धा माहिती आता माध्यमांमध्ये येते आहे.

पण दुसरे दुसरी जी आरोपी आहे मनीषा वाघमारे आणि मनीषा मांद्रे, या दोन्ही मधल्या लिंक सुद्धा आता या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे. अनेक वेगवेगळे अँगलस या सगळ्या प्रकरणामध्ये सापडतात, म्हणजे अनेक पालक असे आहेत ज्यांनी त्यांच्या पाल्यांसाठी पाच ते दहा लाख रुपये मोजून लीक झालेला पेपर खरेदी केलेला होता, पण आता या सगळ्या प्रकरणातील धागेदोरे हे शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, शुभम खैरनार, सोबतच मनीषा वाघमारे, मनीषा मांद्रे या सगळ्या आरोपींपर्यंत पोहोचतो आहे. अजून सुद्धा सीबीआयने या सगळ्या प्रकरणांमध्ये देशभरात, महाराष्ट्रासोबतच देशभरात अटॅक सुरू ठेवलेले आहेत.

आता कालच लातूरमध्ये एक एमबीबीएस डॉक्टर आहेत, त्यांच्या घरी सुद्धा सीबीआयने धाड टाकलेली आहे ते त्यांनी पेपर काही लाखमध्ये खरेदी केला आहे ही प्राथमिक माहिती त्याच्या या प्रकरणामध्ये समोर येते आहे आणि हे जसे आता आत्ताच्या प्रकरणामध्ये बोलायचं झालं तर या पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांद्रे यांच्यांनी ज्या प्रश्नपत्रिका लीक केल्या आहेत ते तुम्ही याची माहिती अशी प्रश्नपत्रिका ट्रांसलेट करून सगळ्या त्यांच्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविलेली सगळी माहिती या प्रकरणामध्ये समोर येत आहे. तुम्हाला या सगळ्या केसांमधे काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तकच्या यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Leave a Reply

Translate »