Thalapathy Vijay CM Tamil Nadu

( Thalapathy Vijay CM Tamil Nadu ) थालापती ते जननेता पर्यंत, बापाने असं तयार केलं विजयच्या जिंकण्याचं ब्ल्यू प्रिंट आणि जिंकून दाखवलं

जसे की आपल्यापर्यंत बातम्या पोहोचत आहेतच की तमिळनाडूचे नवीन होणारे सीएम हे थालापती विजय हे आहेत, यामध्ये हे त्यांचेच काम मोठे नाहीये त्याच्यामागे त्यांचे पिता एस एस चंद्रशेखर यांची प्लॅनिंग पण खूप दमदार होती. फिल्म करिअर पासून राजकारणामध्ये कशाप्रकारे आले आणि आज चक्क एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून समोर येत आहेत हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

तमिळनाडूमध्ये जे मतदान झालं आहे त्यांच्या संदर्भात ही सर्वात मोठी आत्ताची बातमी आहे. राजनीति मध्ये ज्याला कमी आखलं गेलं होतं ज्याच्याकडून अपेक्षा ठेवले नव्हत्या मोठमोठ्या राजनैतिक लोकांनी आणि पार्ट्यांनी या माणसाला सुरुवातीला कमी लेखलं होतं किंवा याला टोमणे मारले होते आज तोच माणूस पूर्ण तमिळनाडूमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. तब्बल खूप सारे सीट्स आणून डायरेक्ट सीएम पोस्ट सर केली आहे.

आता एवढा मोठा विजय असल्यामुळे सहाजिकच विजयने सर्वात आधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. विजयच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर तमिल इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेले डायरेक्टर आणि प्रोडूसर आहेत एस ए चंद्रशेखर. आज विजय फिल्मस्टार पासून जर राजनीतिक नेता बनत असेल किंवा बनला आहे याबाबत सर्वात मोठं कारण म्हणजे विजयचे वडील ज्यांनी खूप दिवसांपासून विजयला राजकारणात घेऊन येण्यासाठी स्वप्न रंगवले होते.

एस ए चंद्रशेखर यांनी विजयला लहानपणापासूनच स्क्रीन वरती ठेवलं होतं. छोट्या वयापासूनच विजयला स्क्रीन ची सवय लागली होती. आणि यात बहुदा त्यांचे नावाजलेले जे चित्रपट आहेत यामध्ये त्यांनी सरकारविरुद्ध किंवा सरकारी कामाविरुद्ध खूप वेळा आवाज उठवलेला ही दिसून येत आहे. कदाचित याच काही गोष्टी आहेत ज्यावरून आपण एक आशा लावू शकतो की विजयचे वडील जे की स्वतः डायरेक्टर प्रोडूसर असल्यामुळे विजयला या विषयांमधील चित्रपटांची भूमिका देऊन राजकारणामध्ये त्यांचा पाय रोवण्याचे काम करत होते.

तसं बोलायचं झालं तर आज जे राजकारणी आपण बघत आहेत यांमध्ये जास्त करून वारसा हक्क गाजवला जातो. प्रत्येक ठिकाणी बघितलाच तर ज्या घरातील आमदार आज आहेत पुढे चालून 20 25 वर्ष ही सत्ता त्याच घरातली लोकं भोगतात. आणि हे काही महाराष्ट्र पुरते मर्यादित नसून पूर्ण देशभरात हेच असते. प्रत्येक राजकारणी माणूस आपली सत्ता घराबाहेर न जावो यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. नवीन येणारे राजकारणी पुढारी नेते युवा नेते या सर्वांना मागे ठेवून स्वतःच्या घराचा वारसा आणि स्वतःच्या घराची इमेज कशी राहील यावरच आज कालचे राजकारणी लक्ष देत आहेत.

पण थालापती विजय यांनी हे गणित मोडीस आणले आहे. आपल्या दणदणीत विजयाने यांनी हा वारसा हक्क मोडीत काढला आहे. आपण बऱ्याच ठिकाणी हे वारसा हक्क बघितले आहेत आणि बघतही आहोत पण तमिळनाडूतील या दणदणीत विजयामुळे कदाचित यापुढे वारसा हक्क कमी होऊन नवीन उमेदवारांना जागा मिळेल. लोकांनी दाखवलेला विश्वास आणि लोकांच्या मनात असलेल्या प्रेम हे आज विजय यांच्या विजयानंतर दिसून आला आहे. कदाचित फिल्म्स मध्ये विजय जे सरकार विरुद्ध आवाज किंवा सरकारी कामांविरोधात ॲक्शन घेत असतात किंवा बोलत असतात रियल लाईफ मध्ये ज्यावेळेस हे सरकार चालवतील त्यावेळेस कदाचित यापेक्षाही चांगली भूमिका निभवतील आणि स्वतःच्या राज्याचा चांगला विकास करतील अशीच अपेक्षा आहे.

लोकांना पण असेच व्यक्ती राजकारणात हवे असतात ज्यांनी आपल्या कामातून आधी दाखवून दिलेले असते की आपण या पोस्ट वरती राहून काय काय करू शकतो लोकांसाठी लोकांच्या भविष्यासाठी लोकांच्या लेकरा बाळांसाठी लोकांच्या आरोग्यासाठी. तरी जनतेने हा दाखवलेला विश्वास विजय यांनी कायम ठेवावा आणि त्यांच्या या नव्या जीवन प्रवासाला सुरुवात करावी.

Leave a Reply

Translate »