Navtapa 2026 Maharashtra Weather : Heatwave मुळे Maharashtra Monsoon उशिरा येणार?. गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. काही अभ्यासकांच्या मते हा पाऊस मान्सूनपूर्व आहे, तर काहींच्या मते हा पाऊस अवकाळी आहे. यंदा मान्सून अन्य वर्षांच्या तुलनेत लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण हा अंदाज चुकीचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कारण, 25 मेपासून सुरू झालेल्या नवतपामुळे तापमान 45 ते 55 डिग्री पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा नवतपा यंदा अधिक तीव्र असणार, असे म्हणले जात आहे. त्याचा थेट परिणाम मान्सूनच्या आगमनावर होऊ शकतो. हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये आणि ज्योतिषशास्त्रात नवतपाची संकल्पना मान्य केली गेली आहे.
Petrol Diesel Price Hike India: दिल्लीत पेट्रोल ₹102 पार, देशभरात इंधन दरवाढ
पण मान्सूनच्या आगमावर प्रभाव टाकणारा नवतपा नेमका काय असेल? त्यात ऊन का फार वाढते? आणि नवतपामुळे मान्सून केव्हा येईल? या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहत आहात बोलबिडू. गेल्या आठवड्यात देशात काही ठिकाणी पाऊस झाला. यावेळी हवामान विभागाने लवकर मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला होता. पण 25 मेपासून सुरू झालेल्या नवतपामुळे पुन्हा उष्णतेची लाट येऊ शकते.
या नऊ दिवसांमध्ये उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात तापमान 45 ते 50°C च्या दरम्यान जाईल, आणि काही मैदानी भागात ते 50°C च्या जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 25 तारखेला राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील विदर्भात तीव्र उष्णतेची लहर दिसली. आयएमडीने 26 मेसाठी अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अत्यंत उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला आणि नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या नऊ दिवसांमध्ये उष्माघाताचा धोका वाढला आहे. नवरातपाच्या काळात रात्र वेळीही सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील, त्यामुळे दिवसात प्रचंड उष्णता आणि रात्री उकाडा पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवतपा जरी तीव्र तापमान असला तरी मान्सूनवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असे म्हटले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा नवतपा दरवर्षी येतो, पण मान्सूनच्या आगमनावर याचा काही प्रदर्शनात्मक फरक पडत नाही. ज्योतिषाच्या मते, नवतपामध्ये असलेल्या तापमानावर मान्सून अवलंबून असतो. पूर्वीच्या अंदाजानुसार मान्सून 26 तारखेला अंदमान, 1 जूनला केरळ, 5 ते 7 जुनदरम्यान कोकण, आणि 15 जुनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात येईल, असे म्हटले होते.
Petrol Diesel Price Hike India: दिल्लीत पेट्रोल ₹102 पार, देशभरात इंधन दरवाढ
उन्हाळ्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांचा उल्लेख केला जातो. या कालावधीतील उष्णतेसाठी विज्ञान आणि ज्योतिष दोन्ही या नवतपाचे कारण सांगतात. हा नवतपा उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो. महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात याला नवतपा असे म्हणतात, तर दक्षिण भारतात याला अग्नि नक्षत्र किंवा कत्तरी वेल असे म्हणतात.
तज्ञांच्या अभ्यासानुसार, 1000 वर्षांपूर्वी नवतपाची सुरुवात 11 मेला व्हायची, पण पृथ्वीच्या अक्षांशांमुळे हा काळ आता 25 मेच्या आसपास सुरू होतो. दरवर्षी मार्च महिन्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकतो, आणि मेअखेरीस कर्कवृत्ताच्या जवळ पोहोचतो, म्हणजे सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. यामुळे भारतात प्रचंड उष्णता निर्माण होते.
या नवतपेचा परिणाम मुख्यत: समुद्रापासून लांब असलेल्या राज्यांवर अधिक असतो, जसे राजस्थान आणि मध्य प्रदेश. हवेतील आद्रता कमी होते आणि जमिनीचा तापमान वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवतपाचे नऊ दिवस फायदेशीर ठरतात. वैज्ञानिकांच्या मते, नवतपाच्या काळात जमिनीच्या जवळची हवा गरम होते, ज्यामुळे लो प्रेशर झोन तयार होतो. समुद्रावरच्या मानसूनच्या वाऱ्यांना भारताकडे ओढून आणते.
पण यामध्ये नेहमीचे तापमान प्रमाणबद्ध नाही. त्यामुळे नवतपाला किती तापमान होईल यावर मान्सूनाचे भविष्य ठरवता येत नाही. नवतपा उष्ण राहिल्यास मान्सून लवकर येतो, पण या नऊ दिवसांमध्ये अचानक पाऊस झाल्यास मान्सून उशीराने येऊ शकतो. या नऊ दिवसांचा परिणाम पावसाळ्याच्या शेवटी कमी पावसावर होत असल्याचे म्हणले जाते.
यंदाचा नवतपा 25 मेपासून 2 जूनपर्यंत आहे. आयएमडीच्या संशोधनानुसार, 26 आणि 27 मे सोडून, 28, 29, 30, 31 आणि 1 व 2 जूनला विविध ठिकाणी हलक्या सरी आणि वादळी वार्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकानुसार, 20 तारखेनंतर राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कसा नवतपा अनुभवायला मिळाला, हे सांगायला विसरू नका. कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.
Petrol Diesel Price Hike India: दिल्लीत पेट्रोल ₹102 पार, देशभरात इंधन दरवाढ
#Navtapa2026 #MaharashtraWeather #Heatwave #MonsoonUpdate #WeatherNews #IMD #RainForecast #Vidarbha #ClimateUpdate #WeatherMarathi