Apple iPhone 18 Pro Series 2026 Launch Date, A20 Pro Chip, AI Features, Price & Specifications

Apple iPhone 18 Pro Series 2026 Launch Date, A20 Pro Chip, AI Features, Price & Specifications. Apple iPhone 18 Pro Series 2026: नवीन डिझाइन, A20 Pro चिप आणि AI फीचर्ससह आणखी खूप काही.

Table of Contents

Table of Contents

Apple आपल्या पुढील सीरीस  iPhone 18 Pro Series  सप्टेंबर 2026 मध्ये सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीच्या पारंपरिक लॉन्च वेळापत्रकानुसार, सप्टेंबर 2026 च्या मध्यात नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मॉडेल्स सादर होणार आहेत. यावेळी Apple आपल्या स्मार्टफोनमधे काही मोठे बदल करू शकते. यामध्ये नवीन डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, AI आधारित फीचर्स आणि नवीन रंग या गोष्सटींचा समावेश असेल.
मार्केट मध्ये कधी येणार हे नवीन फोन     

मिळालेल्या माहितीनुसार, Apple चा वार्षिक लॉन्च कार्यक्रम सप्टेंबर 2026 च्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो आणि या वेळीच कदाचित ही सीरीस आपल्याला पाहायला मिळेल.

* घोषणा (Announcement):  सप्टेंबर 2026 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात.
* Pre-Order :  11 सप्टेंबर 2026 (शुक्रवार) पासून सुरु होऊ शकते. 
* विक्री सुरू:  18 सप्टेंबर 2026 (शुक्रवार) पासून सुरु होऊ शकते.

 

Google ची 32 दशलक्ष डासांची फौज Google Mosquito Army! डासांविरुद्धच्या नव्या तंत्रज्ञानामागचं सत्य जाणून घ्या

 

Apple च्या मागील काही वर्षांच्या लॉन्च पद्धतीवरून ही वेळापत्रक अपेक्षित मानली जात आहे.

iPhone 18 Pro Series मध्ये काय नवीन असू शकते?

यावेळी  Apple आपल्या Pro सीरीस मध्ये मोठे हार्डवेअर सुधारणा करण्याचा विचार करत आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे A20 Pro चिपसेट, जो अत्याधुनिक 2nm उत्पादन प्रक्रियेवर आधारित असू शकतो.

संभाव्य Specifications 
प्रोसेसर

* Apple A20 Pro Chipset असेल.
* 2nm Process Technology असेल.
* उच्च वेगवान AI आणि मशीन लर्निंग क्षमता असू शकते.

RAM

* 12GB RAM पर्यंत असू शकतो.
* AI आधारित कामांसाठी अधिक कार्यक्षमता असेल. 

डिस्प्ले

* Super Retina XDR OLED Display 
* 120Hz ProMotion Refresh Rate
* अधिक ब्राइटनेस आणि ऊर्जा बचत करण्याची नवी पद्धत.

कॅमेरा

* सुधारित Triple Camera System
* AI आधारित फोटो प्रोसेसिंग
* अधिक चांगला Night Mode आणि Zoom पान या मध्ये पाहायला मिळणार आहे.

बॅटरी

* अधिक कार्यक्षम बॅटरी व्यवस्थापन
* फास्ट चार्जिंग सपोर्ट
* दीर्घ बॅटरी बॅकअप

नवीन Dark Cherry रंग

iPhone 18 Pro सीरीस मध्ये  Apple एक आकर्षक Dark Cherry रंग सादर करू शकते. हा गडद लाल किंवा वाईन-रेड रंगाचा प्रीमियम पर्याय असणार असून Pro मॉडेल्सना अधिक आकर्षक लूक देईल.

AI फीचर्सवर भर

Apple सध्या AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे iPhone 18 Pro मध्ये अधिक प्रगत Apple Intelligence फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये स्मार्ट फोटो एडिटिंग, AI सहाय्यक, रिअल-टाइम भाषा अनुवाद आणि वैयक्तिकृत सूचना यांचा समावेश असू शकतो.

मॉडेल्समध्ये बदल

अहवालांनुसार, Apple 2026 मध्ये आपली उत्पादन रणनीती बदलू शकते. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे मॉडेल्स सप्टेंबर 2026 मध्ये लॉन्च होतील. सामान्य iPhone 18 आणि इतर बेस मॉडेल्सचे लॉन्च 2027 च्या वसंत ऋतूपर्यंत ( Spring 2027 ) पुढे ढकलले जाऊ शकते.

किंमत किती असू शकते?

विश्लेषकांच्या मते, Apple आपल्या Pro मॉडेल्सच्या किंमतीत मोठी वाढ करण्याची शक्यता कमी आहे.

संभाव्य किंमत:

iPhone 18 Pro :  सुमारे $999 पासून
iPhone 18 Pro Max :  सुमारे $1199 पासून

भारतात याची सुरुवातीची किंमत अंदाजे ₹1,29,900 ते ₹1,49,900 दरम्यान असू शकते.

iPhone 18 Pro Series ही Apple च्या इतिहासातली सर्वात प्रगत स्मार्टफोन मालिकांपैकी एक ठरू शकते. नवीन A20 Pro चिप, AI फीचर्स, Dark Cherry रंग, सुधारित कॅमेरा आणि अधिक RAM यामुळे हा फोन तंत्रज्ञानप्रेमींसाठी खास आकर्षण ठरणार आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत ही माहिती संभाव्य अहवाल आणि लीकवर आधारित आहे, मात्र Apple चाहत्यांची उत्सुकता आधीपासूनच शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Translate »