तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्याच्या सर्वात मोठे दुःख काय असते. ( Indian farmer problems !! शेतकऱ्याचं सर्वात मोठं दुःख काय आहे? )
शेतकऱ्याचे दुःख एकच नाही. ते रोज बदलते. एकत्र बघितले तर अनिश्चितता सर्वात मोठे दुःख आहे. शेतकरी आज पेरणी करतो, पण उद्या पाऊस येईल का याची खात्री नसते. पाऊस आला तर कधी जास्त येतो, कधी थोडा किंवा नाही. त्यामुळे उगवलेले पीक जळते किंवा बुडते. शेतकरी आकाशाकडे बघतो. ढग जमा होतात, आशा वाढते. पण वारा येऊन ढग उडून जातात, मनात निराशा राहते. हे शेतकऱ्याचे रोजचे आयुष्य आहे. देवा दोन थेंब तरी पाड अशी मनातली प्रार्थना आणि हातात काहीच नसल्याची जाणीव हीच त्याची खरी वेदना आणि सर्वात मोठे दुःख आहे.
तसं पाहिलं तर पावसावर सगळं अवलंबून असल्यामुळे शेती म्हणजेच जुगारच वाटतोय. कधी कधी बियाणे टाकताना मनात हजार स्वप्न असता यंदा पीक चांगलं आलं तर कर्जफेडू घर बांधू मुलाला चांगलं शाळेत घालू पण निसर्गाने साथ दिली नाही की सगळे स्वप्न धुळीत मिसळतात. उगवलेला पिक अचानक खराब होतं किडी लागतात औषध टाकले तरी काही उपयोग होत नाही औषध तुमचा खर्च वेगळाच आणि तरीही आम्ही नाही की पीक वाचायला आज टाकलं औषध तर ठीक उद्या पाऊस आला तर सगळं वाया ही काळजी कायम डोक्यात असते शेतकऱ्याच्या.
कर्ज शेतकऱ्याच्या छातीवरचा सततचा ओझा आहे. बँकेचे कर्ज वेळेवर परत करायचे असते, त्याबद्दल त्याला भीती वाटते. खाजगी सावकाराचे कर्ज जास्त व्याजाचे असते, ओझा वेगळा असतो. शेतकऱ्याकडे फक्त एकच आशा असते—पीक चांगले झाल्यास सर्व ठीक होईल. तो ही आशा धरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. पण एकदा किंवा दोनदा अपयश आल्यावर मन खचते, कुटुंबही आशा ठेवत बसते. त्यावेळी शेतकऱ्याला कळते की तो कुटुंबाची उपजीविका किंवा त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यावेळेस शेतकरी खरा खचतो. आणि कधी कधी या खचण्यामुळेच शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात.
सध्याच्या काळात शेतकऱ्याने किती बी राबराब राबले ना तरी त्याच्या पिकांना हमीभाव नाहीये. शेतकऱ्याला जशी आशा असते की या वेळेस आपण या धान्याचे पीक घेतल्यानंतर त्याला एवढा एवढा भाव मिळेल आणि आपलं कर्ज आपली परिस्थिती थोडीशी सुधारेल, ही आशा प्रत्यक्ष शेतकऱ्याला असते पण प्रत्येक वेळेस ती मोडीस येते. आणि शेतकरी दरवर्षीप्रमाणे खचत राहतो.
आजकालच्या शेतकऱ्यांमध्ये एक गोष्ट ऐकली का तुम्ही, शेतकऱ्यांचे म्हणणे येतं की शेती जर मनापासून केली तर उत्पन्न खूप देते आणि भरपूर पैसा कमावण्याचे साधन पण असतात शेतीमधून. पण जर तुमच्याकडे शेती थोडीच आहे आणि त्यामधून जर तुम्ही पूर्ण कुटुंब फक्त शेतीच्या जीवावर जगवायचं म्हणत असाल तर ते तुमच्यासाठी खरंच खूप अवघड जाऊ शकते. आपण इथं बसल्या बसल्या शेतकऱ्याच्या जीवनाशी किंवा त्याच्या समस्याबद्दल पूर्णपणे आणि योग्यरीत्यांनाही बोलू शकत पण कदाचित काही गोष्टी काही अडचणीच्या आपल्या निदर्शनास येत आहे यावरती तरी चर्चा नक्कीच करू शकतो.
शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. पण काही योजना फक्त कागदावरच आहेत. शेतकऱ्यांना योजना मिळाली का, मिळत आहेत का, यावर कोणीही लक्ष देत नाही. शेतकरी वर्ग मध्यम शिक्षणाचा आहे. बरेच शेतकरी अडाणी असतात. कागदपत्रांची अडचण मोठी असते. त्यामुळे शेतकरी थेट योजना सोडून देतात. शासकीय योजना विसरून जातात. पिक विमा घेतला तरी नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही. भरपाई मिळाली तरी रक्कम कमी असते. कागदावर मदत दिसते, पण हातात मदत नाही. नाही, अशा भावना तयार होतात, त्यामुळे शेतकऱ्याला शासनावरचा विश्वास राहिला नाही.
गावात कामासाठी लोक मिळत नसल्यामुळे मजुरीचा प्रश्न मोठा आहे. काम मिळाल्यावर मजुरी जास्त असते, परंतु कुटुंबासोबत काम करायचे असले तरी उत्पन्न अनिश्चित राहते. शहरातील लोक मानतात शेतकरी फक्त पिके लावणारा आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मागे असलेले कष्ट शहरातील लोकांना दिसत नाहीत. पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतकरी उष्ण उन्हात अंग भाजणे, पावसात भिजणे, पायाने भटकणे यांसारखी कामे करतो. शेतकरी दररोज उष्ण उन्हात अंग भाजणे, पावसात भिजणे, पायाने भटकणे यांसारखी कामे करतो. एसीच्या रूममध्ये बसून काम करणार्या लोकांना शेतकऱ्यांच्या कष्टांची किंमत कळत नाही. शासकीय अधिकारी यशाच्या रूममध्ये बसूनच शेतकऱ्यांसाठी सर्व योजना ठरवतात. जमिनीच्या पातळीवर विचार करून शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आल्या आहेत, तपासणे आवश्यक आहे. सरकारच्या आतापर्यंत कोणी सांगू शकता का. की जास्त पाऊस की नुकसान भरपाई दुष्काळ पडला की नुकसान भरपाई शेतीमध्ये कशामुळे कशाचा नुकसान झाले तर नुकसान भरता येईल शेतीच्या काही व्यवहारातून शेतकऱ्यांची काय नुकसान झाले तर नुकसान भरपाई हे सर्व कारण ज्यावेळेस होतात त्यावेळेस ते फक्त नवीन नवीन राहतात आठवडा पंधरा दिवस केले की नंतर त्या शेतकऱ्याला कोणी विचारून पण बघत नाही.
सध्याचा मोठा प्रश्न काय आहे? जगाला अन्न देणारा शेतकरी आज खूप कठीण जीवन जगतो. शेतकरी शेती थांबवला तर जग कसे जाईल? जग तीन वेळा अन्न खातं, पण अन्न शेतकरी देतो. शेतकरीला थोडा मान, सन्मान आणि चांगली वागणूक द्यावी. शेतकरी पिकांची काळजी घेईल. शेतकरी पिकांना नुकसान होऊ देऊ नये. शेतकरी वेळेवर मदत मिळाली तर शेतकरीला चांगले उत्पन्न मिळेल. शेतकरी सुखी राहिला तर जगही सुखी राहील.
hii