रोहिणी परादे प्रकरण : Hotel Grampanchayat ची प्रसिद्ध Reel Star अचानक चर्चेत | Rohini Parade News

रोहिणी परादे प्रकरण : Hotel Grampanchayat ची प्रसिद्ध Reel Star अचानक चर्चेत | Rohini Parade News. रोहिणी परादे. मंगळवेढा तालुक्यातल्या ब्रह्मपुरी गावात राहणारी 25 वर्षांची महिला. रोहिनं निलेश पारादेशी प्रेमविवाह केला. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुण्यात राहायला लागले. पुण्यात असताना दोघेही रील करायला लागले. रीलच्या माध्यमातून सोशल मीडियावर हे जोडपं चांगलंच प्रसिद्ध झालं. त्यानंतर आपल्या मूळ गावी परतलेल्या दोघांनी हॉटेल ग्रामपंचायत नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेल ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं.

 

New Tata Tiago 2026 Launch: Budget Hatchback मध्ये काय काय नवीन मिळतं?

 

सोशल मीडियावरच्या या प्रसिद्धीमुळे त्यांच्या हॉटेलमध्ये सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोकं यायचे. रील्स आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या चविष्ट जेवणामुळे रोहिणी निलेशची जोडी थोड्याच वेळात चांगलीच फेमस झाली. पण 26 मे ला रोहिणी बद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली. ज्या हॉटेलमुळं ती सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध झाली होती, त्याच हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये तिनं स्वतःला संपवलं. लोकांनी हॉटेल ग्रामपंचायत समोर मोठी गर्दी केली.

संध्याकाळच्या सुमारास रोहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण रील स्टार असलेल्या रोहिणीनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? सगळं काही सुरळीत असताना तिनं स्वतःला का संपवलं? असे गंभीर प्रश्न विचारले जात आहेत. या संदर्भात पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली असून यामागं कौटुंबिक वाद असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पण रोहिणी नक्की कोण होती? प्रथमदर्शनी तिच्या मृत्यूमागं कोणती कारणं सांगितली जात आहेत?

सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातलं ब्रह्मपुरी गाव. इथला निलेश पारादे हा स्थानिक पत्रकार म्हणून काम करायचा. सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरातल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायचा. साधारणपणे चार ते पाच वर्षांआधी त्यानं गावातच राहणाऱ्या रोहिणीसोबत प्रेमविवाह केला. मग लग्न झाल्यापासून दोघंही जोडीनं व्हिडिओ बनवायला लागले. दोघांनी वेगवेगळे व्हिडिओ बनवून Instagram आणि Facebook आणि YouTube वर अपलोड करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे ब्लॉग्स व्हायरल व्हायला लागले. नंतर दोघांनी Instagram वर रील्स बनवायला सुरुवात केली.

नवरा बायकोची भांडणं, खोड्या, वाटून घेतलेली कामं असा सगळा कंटेंट घेऊन हे दोघं मजेशीर व्हिडिओ बनवायला लागले. सोलापूरच्या ग्रामीण बोलीत अगदी साधेपणानं केलेले त्यांचे व्हिडिओज लोकांना आवडायला लागले. बघता बघता त्यांच्या रील्सला लाखात व्ह्यूज मिळायला लागले. YouTube वर 1 लाख सबस्क्राईबर्स पूर्ण केल्यावर त्यांना सिल्वर बटनही मिळालं होतं. त्यामुळं रील स्टार म्हणून या जोडीला सोलापूर जिल्ह्यात लोकं ओळखायला लागले.

 

New Tata Tiago 2026 Launch: Budget Hatchback मध्ये काय काय नवीन मिळतं?

 

 

निलेश सोलापूर परिसरातल्या बातम्या, सामाजिक प्रश्न त्याच्या अकाउंटवर शेअर करायचा. त्याला सामाजिक कार्याची आवड असल्यानं ऑगस्ट 2024 आणि 25 मध्ये त्यानं परिसरातल्या गोरगरीब जोडप्यांची लग्नं लावून दिली होती. त्याच्या या कामात रोहिणी त्याला नेहमी मदत करायची. रील आणि समाजकार्यातून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांनी गावातूनच जाणाऱ्या सोलापूर- मंगळवेढा हायवेवर हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं. स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी रोहिणीकडेच होती. त्यांनी आपल्याच हॉटेलमध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या रील सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि त्यांना चांगल्या कमेंट यायला लागल्या.

सोशल मीडियावरच्या या प्रसिद्धीचा त्यांना आपल्या हॉटेल व्यवसायात सुद्धा फायदा झाला आणि त्यांचं हॉटेल खूप कमी वेळात प्रसिद्ध झालं. फक्त मंगळवेढा, सोलापूरच नाही तर आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांमध्ये लोकं सुद्धा हॉटेल ग्रामपंचायतमध्ये जेवायला येऊ लागले. आणि यात अगदी मोठ्या राजकारण्यांचा सुद्धा समावेश होता. दोघांनीही स्वबळावर आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली आणि कमी काळात तो यशस्वी सुद्धा करून दाखवला. पण 26 मे च्या दुपारी रोहिणीनं तिच्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन स्वतःला संपवल्याची बातमी आली. या बातमीनं सगळ्यांनाच धक्का बसला.

स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मे च्या दुपारी 2 च्या दरम्यान रोहिणी आणि निलेश हे दोघेही नेहमीप्रमाणं हॉटेल ग्रामपंचायतमध्ये होते. दरम्यान, कुठल्यातरी कारणामुळं दोघांमध्ये वाद झाला. थोडा वेळ झालेल्या बाचाबाचीनंतर रोहिणी हॉटेलच्या किचनमध्ये निघून गेली. ही गोष्ट निलेशला साधी वाटली. त्यामुळं तो बाहेर बसून मोबाईल बघत बसला होता. पण बराच वेळ झाला तरी रोहिणी बाहेर आली नाही. तिचा आवाजही येत नसल्यानं निलेश तिला बघण्यासाठी किचनकडे गेला. निलेशनं रोहिणीला हाका मारल्या पण तिच्याकडून कोणताच प्रतिसाद न आल्यानं निलेशनं धक्का देऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

त्यानं किचनच्या खिडकीतून आत बघितलं तेव्हा त्याला रोहिणी पत्र्याखाली लावलेल्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली. हे दृश्य पाहून धक्का बसलेल्या निलेशनं लगेच आजूबाजूच्या लोकांना बोलावून किचनचा दरवाजा तोडला. रोहिणीला खाली उतरवून अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. दोन दिवसांआधीच निलेशनं अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये ती अगदी आनंदात असल्याचं दिसत होतं. मग अचानक तिनं हे पाऊल का उचललं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

New Tata Tiago 2026 Launch: Budget Hatchback मध्ये काय काय नवीन मिळतं?

 

 

या सगळ्या संदर्भात रोहिणीचे सासरे विलास परादे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की रोहिणीला असं विलास पारदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, रोहिणीला असं पाऊल उचलायला अचानक काय झालं हेच कळेना. त्यांचा हॉटेल व्यवसाय होता, चांगलं चाललं होत ना, सुखानं संसार सुरू होता, पण तिनं अचानक असं पाऊल का उचललं, असं सोडून का गेली, हे माहितच नाही आम्हाला. अशा शब्दात तिच्या सासऱ्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. दुसरीकडं मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिट्टे यांनी माध्यमांना माहिती दिली की, 26 मे रोजी निलेश पारदे यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की, त्यांची पत्नी रोहिणी हिनं त्यांचे हॉटेल ग्रामपंचायत किचन मध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. त्यांनी त्यांच्या कबुली मध्ये अज्ञात कारण असं दिलं आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादाच्या कारणावरून रोहिणीन असं केल्याचं समोर आलंय.

अधिक तपास सुरू आहेत, सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी आणि निलेश मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या होत्या. पण दोन्ही नवीन शाखांचं व्यवस्थापन करणं, त्यांची आर्थिक गडी नीट बसवणं आणि हॉटेल उत्तम रीतीनं चालवणं या गोष्टी करताना त्या दांपत्याची मोठी तारेवरची कसरत होत होती. या वाढत्या व्यवसायाच्या व्यापांमुळं आणि आर्थिक गणितामुळं दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. याच रागाच्या भरात रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडं रोहिणीचा निलेश सोबतचा हा दुसरा विवाह असल्याचंही सध्या समोर आला आहे. त्यामुळं नक्की दोघांमध्ये काही मतभेद होते, व्यवसायाचा आर्थिक ताण होता की, अन्य काही खाजगी कारण होतं याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत, पण या सगळ्यामध्ये रोहिणीच्या माहेरच्यांची भूमिका अजून समोर आलेली नाहीये. त्यांनी निलेश बद्दल किंवा रोहिणीच्या मृत्यू बद्दल कोणतीही तक्रार केली नाही, त्यामुळं या संदर्भात काही माहिती पुढे येते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

थोडक्यात प्रथम दर्शनी आर्थिक ताणतणाव किंवा कौटुंबिक कलहातून रोहिणीनं स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज सध्या पोलिसांकडून आणि स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा. 

Leave a Reply

Translate »