Bangladesh vs Pakistan Match Prediction 2026 : कोण जिंकेल सामना? बांगलादेश वर्सेस पाकिस्तान हा सामना म्हणजे फक्त क्रिकेटचा खेळ नाही तर दोन हटके आशियाई संघांमधील जोरदार टक्कर असते एकीकडे पाकिस्तानचे वेगवान गोलंदाजी चा तडाखा असतो तर दुसरीकडे बांगलादेशचा हट्टी आणि लढवही खेळण्याची स्टाईल असते. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल याचा अंदाज बांधणं इतकं सोपं नाही पण गावाकडच्या किंवा आपल्या सरळ भाषेत बोलायचं झालं तर ज्यांचा दिवस भारी त्यांचीच मॅच भारी.
पाकिस्तानचा संघ नावाने मोठा आणि इतिहासाने भारी मानला जातो पाकिस्तान नॅशनल क्रिकेट टीमने जगभरात अनेक मोठमोठे सामने जिंकले आहेत त्यांच्या टीम मध्ये नेहमी वेगवान गोलंदाज असतात चेंडू हातात घेतला की फलंदाजाच्या छातीत भडके भरवणारे बॉलर पाकिस्तान कडे कायम असतातच त्यांची गोलंदाजी जर सुरुवातीला चालली तर समोरचा संघ दबावत जातो म्हणजे जातो.
पण क्रिकेटमध्ये नावाने सामना जिंकत नाही मैदानावर त्या दिवशी कोण चांगला खेळत हे महत्त्वाचं असतं आणि इथेच बांगलादेश नॅशनल क्रिकेट टीम लोकांना आश्चर्य देताना दिसून येते आधी बांगलादेशाला लोक कमी समजायचे ही तीन काय करणार म्हणून पण असा प्रश्न विचारायला जायचा त्या टीमला पण गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या संघांना धूळ चारली भारत पाकिस्तान श्रीलंका यांसारख्या संघाने हरवून त्यांनी स्वतःचा एक वेगळं स्थान निर्माण केलंय आणि हे फक्त त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये करून दाखव.
बांगलादेशचा खेळ पहिला तर एकच गोष्ट लक्षात येते हे लोक शेवटपर्यंत हार मानत नाहीत सामना हातातून गेला असला तरी शेवटच्या वर पर्यंत झुंज देतात आपल्याकडे कसं एखादा शेतकरी शेवटच्या पावसापर्यंत अशा सोडत नाही तसं काहीतरी बांगलादेश यांच्या टीम सोबत पण असंच आहे.
या सामन्यात कोण जिंकेला हा प्रश्न विचारला तर कागदावर पाकिस्तान भारी दिसतो त्यांच्याकडे अनुभव आहे मोठे खेळाडू आहेत मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे पण जर बांगलादेशाने सुरुवातीला विकेट घेतल्या आणि पाकिस्तानच्या फलंदाजावर दबाव टाकला तर सामना उठू शकतो क्रिकेटमध्ये एका ओव्हर मध्ये पूर्ण गेम फिरवला जाऊ शकतो.
या सामन्यात कोण जिंकेल हा प्रश्न विचारला तर कदाचित लोक हे पण बोलतील की पाकिस्तान जिंकू शकेल पाकिस्तानच्या टीमची एक मोठी समस्या म्हणजे सातत्य एक सामना पारित करतात आणि दुसरा सामना अचानक खराब करून घेतात त्यांचा क्रिकेट म्हणजे एकदम आपल्या पावसासारखा आहे कधी जोरदार कधी गायब त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांनाही शेवटपर्यंत खात्री नसते की नेमका आपला पाकिस्तान जिंकेल की समोरचा देश जिंकेल.
जर खेळपट्टी फलंदाजाची चांगली असेल तर पाकिस्तानचा फायदा होऊ शकतो कारण त्यांच्याकडे आक्रमक फलंदाज आहेत पण जर पीच स्लो असेल किंवा फिरकी गोलंदाजांना मदत करणारे आले असेल तर बांगलादेश मजबूत ठरू शकतो उपखंडातल्या मैदानावरती बांगलादेश नेहमी धोकादायक संघ मानला गेला आहे आपण जसं गावाकडच्या कट्ट्यावर बसून लोक जसं बोलतात ना अरे पाकिस्तान भारी टीम आहे रे पण लगेच दुसरा म्हणतो अरे बांगलादेशाला कमी समजू नकोस हे लोक उलटवतात सामना आणि अगदी तसंच वातावरण या मेसेज पण होईल अशी शंका आहे.
दुसरीकडे बांगलादेशी टीम शांतपणे खेळते ते सुरुवातीला वेळ घेतात आणि नंतर सामना पकडतात त्यामुळे त्यांना कमी समजणं फार धोकादायक करू शकतो जर पाकिस्तानने टॉर्च जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केली आणि मोठाच पूर्व केला तर बांगलादेशावर दबाव येईल पण जर बांगलादेशाने सुरुवातीला विकेट घेतल्या तर पाकिस्तान अडचणीत येऊ शकतो पाकिस्तानच्या टीम मध्ये कधी कधी मधल्या फळीत कोसळण्याची समस्याही दिसून येते या सामन्यात प्रेक्षकांची मोठी भूमिका असते स्टेडियम मध्ये वातावरण भारी असतात चौकार पडला की आवाज विकेट गेले की जल्लोष क्रिकेट म्हणजे भावना आहेत आपल्याकडल्या भाषेत सांगायचं झालं तर क्रिकेट नाहीतर लोकांचा जीव आहे.
माझ्या दृष्टीकोनातून, अनुभवाने पाहता पाकिस्तान थोडा पुढे दिसतो, पण क्रिकेट फक्त अंदाजावर चालत नाही. एक बॅट्समनची इनिंग किंवा एक बॉलरचा ओव्हर संपूर्ण सामना बदलू शकतो. त्यामुळे बांगलादेशाला जिंकण्याची पूर्ण संधी आहे. छोट्या संघांचा काळ संपला आहे; आता प्रत्येक संघ व्यावसायिक झाला आहे आणि फिटनेस ट्रेनिंगही बदलले आहे. त्यामुळे कोणतीही संघ कमकुवत आहे असे मानू नका. जिंकण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघांना संयम ठेवावा लागेल. दाब आणि शांतता दोन्ही महत्त्वाची आहेत. पाकिस्तानकडे आक्रमकता आहे, बांगलादेशकडे जिद्द आहे. क्रिकेटमध्ये जिद्द अनेकदा जिंकण्याचा मुख्य घटक ठरते. मोठ्या संघांना हरवलेले बघितले आहेत.
हा सामना कठीण होईल. पाकिस्तान जिंकेल अशी अपेक्षा आहे, पण बांग्लादेशही आश्चर्याने जिंकू शकतो. त्यामुळे सामना शेवटपर्यंत गेला तरी आश्चर्य वाटू नये. क्रिकेट चाहत्यांसाठी ही मजा असेल.