Deulband 2 Movie Collection: ग्रामीण महाराष्ट्रापासून Multiplex पर्यंत सिनेमाची जोरदार क्रेझ
देऊळबंद दोन आता परीक्षा देवाची. 21 मे ला रिलीज झालेला देऊळबंद दोन हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. पहिल्या चार दिवसांत या सिनेमानं 18 कोटी 59 लाखांचं कलेक्शन केलंय. पहिल्याच वीकेंडला या सिनेमाला बघण्यासाठी थिएटर बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पुणे, मुंबई सारख्या शहरांपासून ते ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 2015 मध्ये आलेल्या देऊळबंदानंतर 11 वर्षांनी आलेला हा दुसरा भाग प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित करतोय. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी हा गंभीर विषय या सिनेमातून मांडण्यात आला आहे. पण हा विषय मांडताना थेट स्वामी समर्थांना परीक्षेला उभी करणारी एक साधी शेतकरी महिला या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे हा विषय ग्रामीण महाराष्ट्राच्या मनाला भिडतो. पण फक्त भावनिक विषयामुळे देऊळबंद दोन चालतो का? की त्याची अजून काही कारणं आहेत? देऊळबंद दोन हिट का होतोय?
सर्वात आधी देऊळबंद दोनने गेल्या चार दिवसांत केलेल्या कमाईबद्दल बोलूयात. 21 मे ते 25 मे या चार दिवसांत देऊळबंद दोनने देशभरात एकूण 18 कोटी 59 लाखांचं ग्रॉस कलेक्शन, तर 15 कोटी 75 लाखांचं नेट कलेक्शन केलंय. पहिल्या चारही दिवसांत देऊळबंद दोनच्या कलेक्शनमध्ये वाढ होत चाललीय. 21 मेला 2.45 कोटी आणि 22 मेला 2.55 कोटींचं कलेक्शन देऊळबंद दोनने केलं. पण शनिवारी आणि रविवारी देऊळबंद दोनचा वीकेंड ब्लास्ट पाहायला मिळाला. शनिवारी देऊळबंद दोनने 4.85 कोटी, तर रविवारी 5.90 कोटींची कमाई केली. मुंबईत या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले असून पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगलीत देऊळबंद दोनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे देऊळबंद दोनची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते.
Coimbatore Girl Murder Case: AI Video मुळे IG Ramya Bharati वादात | Tamil Nadu Crime News
आता देऊळबंद दोन हिट होण्याचं पहिलं कारण म्हणजे सामाजिक विषयाला श्रद्धेची जोड. 2015 मध्ये जेव्हा प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित देऊळबंद सिनेमा आला, त्यात विज्ञान विरुद्ध अध्यात्मातील संघर्ष दाखवण्यात आला होता. राघव शास्त्री हा नास्तिक शास्त्रज्ञ भारतात परत आल्यावर लोकांच्या श्रद्धेला आव्हान देतो. त्यानंतर घडणाऱ्या चमत्कारीक घटना आणि स्वामी समर्थांचं मंदिर बंद पाडण्याची कथा आहे. राघवच्या आयुष्यात केलेल्या बदलांमुळे प्रेक्षकांना त्याच्या नास्तिकतेपासून भक्तीपर्यंतच्या प्रवासाची कथा भावली होती. थोडक्यात, हे देऊळबंदच्या पहिल्या भागाचं गाभा होतं. पण देऊळबंद दोनचं कथानक त्यापेक्षा वेगळं आहे. इथे स्वामी समर्थ आणि भक्ती याभोवतीची गोष्ट फिरते.
देऊळबंद दोनमध्ये एका सामान्य शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. नैसर्गिक संकट, कर्जाचा बोजा आणि त्यामुळे मृत्यूला कवटाळणारा शेतकरी हा गंभीर विषय प्रवीण तरडेने मांडला आहे. पण या संवेदनशील विषयात संगीता नावाची शेतकरी महिला थेट स्वामींच्या अस्तित्वाला आव्हान देत, त्यांचीच परीक्षा घेते. भक्ताचा देवाशी असलेला हक्काचा पण आक्रमक संघर्ष प्रेक्षकांना भावतो. यासोबतच प्रवीण तरडेंच्या पटकथा आणि संवादांनी हा विषय प्रत्येकाच्या मनाला भिडतो. “बाईच्या मनाची खोली मोजू नको,” असं म्हटलं जातं. त्यात शेतकऱ्याचं हे ओरिजिनल आहे. अशा संवादांमुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आपली वाटते.
पहिल्या भागाप्रमाणं देऊळबंद दोनमध्ये स्वामी फक्त एका घरात राहत नाहीत. ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरी सामान्य माणसासारखे वावरतात. संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत न करता, ते त्यांना स्वतः लढण्याची ताकद कशी देतात, याची मांडणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हा सिनेमा फक्त चमत्कारांवर भर देत नाही. कथेचा मोठा भाग शेतकऱ्यांचे प्रश्न, बोगस बियाण्यांचं रॅकेट, कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्रामीण भागातील राजकारण यावर आधारित आहे. यामुळं देऊळबंद दोन एक सामाजिक आणि वास्तववादी चित्रपट बनतो. जसजशी गोष्ट पुढे सरकते, तसतशी प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढत जाते.
संगीता या शेतकरी महिलेचं आव्हान स्वामी समर्थ कसं पेळणार? गावात येणाऱ्या संकटांमधून ते लोकांना कसा मार्ग दाखवणार? हा प्रवास अधिक थरारक असल्याचं प्रेक्षकांनी मांडलंय. देऊळबंद दोनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांचा कनेक्ट. ग्रामीण प्रेक्षकांसाठी या सिनेमातलं जग खूप ओळखीचं आहे. दुष्काळ, शेतीचं नुकसान, कर्जाचा ताण, गावचं राजकारण, देवस्थानांभोवती फिरणारी सत्ता आणि संकटात देवाकडं आशेने बघणारा सामान्य माणूस, हे सगळं ग्रामीण भागात रोजच्या आयुष्यात आहे.
पण शहरी प्रेक्षक सिनेमाशी वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होतात. शहरातल्या माणसाला शेती पायी शेतकऱ्याची झालेली माती अनुभवता येत नाही, पण व्यवस्थेच्या विरुद्धचा त्याचा लढा तो रोजचाच अनुभवतो. कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणाव, महागाई, नोकरीची अस्थिरता आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे येणाऱ्या असहायतेचा अनुभव शहरातला प्रत्येक माणूस घेतो. त्यामुळे या सिनेमातील शेतकरी महिलेचा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा शहरी भागातल्या प्रेक्षकांना, विशेषतः महिलांना, आपलासा वाटतो. “माझ्या कष्टाचं काय? तू देव आहेस ना? मग चुकीच्या माणसांना शिक्षा का नाही होत?” हा प्रश्न शेतकरी महिलेनं स्वामींना विचारला आहे. हे सामान्य नोकरदार माणसाची होणारी कोंडी दाखवते.
सुशिक्षित शहरी तरुणांना अंधश्रद्धा ऐवजी कष्टाचं महत्व सांगणारा स्वामींचा तार्किक दृष्टिकोन सुद्धा प्रचंड भावतो. स्वामी समर्थांचे ग्रामीण भागासह शहरी भागातही लाखो भक्त आहेत. देवळ बंदच्या पहिल्या भागाची कथा शहरी भागातल्या उच्चशिक्षित तरुणाभोवती फिरणारी होती. त्यालाही शहरी भागातल्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 11 वर्षांच्या गॅप नंतर स्वामी समर्थांवर आधारित सिनेमा बघण्यासाठी सिंगल स्क्रीनपासून ते मल्टिप्लेक्सपर्यंत प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. गेल्या काही वर्षांत शहरी प्रेक्षकांमध्ये रूटेड कंटेंट बघण्याचं प्रमाण वाढलंय. गावाकडचं वास्तव, मातीतील भाषा, स्थानिक सांस्कृतिक आणि वास्तववादी पात्र असलेले सिनेमे शहरातल्या तरुण वर्गाला आकर्षित करत आहेत. त्यामुळेच देवळ बंद दोन हा फक्त ग्रामीण महाराष्ट्राचा सिनेमा राहत नाही, तर तो एका सामान्य माणसाच्या संघर्षाची गोष्ट बनतो. हे या सिनेमाचं सर्वात मोठं यश आहे.
Coimbatore Girl Murder Case: AI Video मुळे IG Ramya Bharati वादात | Tamil Nadu Crime News
देवळ बंद दोन प्रेक्षकांना आवडण्यामागचं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तरडे दांपत्याचा संघर्ष आणि तगडी स्टार कास्ट. प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. प्रवीण तरडे त्यांनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केलंय. स्नेहल तरडे यांनी धर्मवीर, फुलवंती अशा सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. फुलवंती सिनेमाच्या दिग्दर्शिका म्हणून त्यांनीही कौतुक मिळवलं होतं. पण देवळ बंद दोनचा टीझर तरडे दांपत्याकडून अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात लॉन्च करण्यात आला. तेव्हा आपल्या स्ट्रगलबद्दल सांगताना स्वामींच्या येण्याने आपल्या आयुष्यात कसे बदल झाले याबद्दल या दांपत्यानं सांगितलं. आमच्या कष्टांना फळ स्वामी कृपेमुळे मिळाल्याचं स्नेहल तरडे म्हणाल्या.
देवळ बंद सिनेमा प्रवीण तरडेंचा पहिला सिनेमा आहे. त्यानंतर स्नेहल तरडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेला देवळ बंद दोन हा सिनेमा स्वामींचीच कृपा असल्याचं स्नेहल तरडे म्हणाल्या. त्या वेळी त्या भावुकही झाल्या होत्या. प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांच्या भूमिकेचं कौतुक करताना, “स्नेहलचं काम पुढच्या अनेक वर्ष लक्षात राहील” असं सांगितलंय. तसेच “मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात शेतीचं वास्तव उभारण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक विषयामुळेच माझा एकही सिनेमा आजवर फ्लॉप गेला नाही,” असं तरडे म्हणाले. त्यामुळे तरडे दांपत्याचा स्ट्रगल आणि त्यांची कलाकृती चांगलीच कौतुक होत आहे.
तसेच पहिल्या भागाप्रमाणे देवळ बंद दोनमध्ये मोहन जोशी हे ज्येष्ठ अभिनेते स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा मोहन जोशींनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारातून उभे राहून मोहन जोशींनी जिद्दीनं सलग 33 तास शूट केलंय. या सिनेमात स्वामी समर्थांच्या मोहन जोशींनी केलेली भूमिका म्हणजे त्यांच्या कामातील सर्वोत्तम भूमिका असल्याचं प्रवीण तरडेंनी सांगितलंय. यासोबतच प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, काश्मीर महाजनी यांच्या भूमिकांनी सुद्धा या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच देवळ बंद दोन बघण्यासाठी प्रेक्षकांनी रांगा लावल्या आहेत. देवळ बंद दोन सिनेमा चालण्याची नेमकी कारणं कोणती? तुम्ही देवळ बंद दोन बघितला असेल तर सिनेमाचा तुमचा अनुभव काय? तो कमेंटमध्ये नक्की लिहा.
#Deulband2 #PravinTarde #MarathiCinema