भारतातील 10 सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू 2026 | कोणाकडे आहे सर्वाधिक संपत्ती? 12th Result 2026 Maharashtra & CBSE Full Information Marathi. बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मोठा टप्पा आहे. दोन वर्षांच्या मेहनतीचा, क्लासेसचा, परीक्षेचा, रात्री जागून केलेल्या अभ्यासाचा आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा परिणाम बारावीचा निकाल आहे. निकाल कधी मिळेल, निकाल कुठे पाहायचा, निकाल कसा पाहायचा आणि निकाल मिळवण्यासाठी काय करावे या सर्व प्रश्नांवर सध्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका आहे.
सध्या महाराष्ट्र बोर्ड सीबीएससी तसेच इतर राज्य बोर्डाचे निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असते मागच्या काही वर्षांचा पॅटर्न पाहिला तर साधारणपणे बारावीचे निकाल हे मे महिन्यातच जाहीर केले जातात काही वेळा निकाल लवकर लागतो तर काही वेळा पेपर तपासणी किंवा तांत्रिक कारणांमुळे थोडासा उशीर होतो पण विद्यार्थी आणि पालकांना घाबरण्याचं काही कारण नसतं बोर्डाकडून अधिक रक्त तारीख जाहीर होता सर्व वेबसाईटवर आणि न्यूज चैनल वरती याची न्यूज दिली जाते की बारावी या वर्गाचा निकाल या या दिवशी लागणार आहे अशी.
निकाल लागण्याच्या आधी विद्यार्थ्यांची अस्वस्थता वेगळीच असते कोणाला वाटत असतं आपलं मार्ग कमी येतील कोणाला वाटतं टक्केवारी येईल की नाही कोणाला वाटतं पास होऊ की नाही तर या सर्व गोष्टींची चिंता विद्यार्थ्यांना नेहमी असते तर काहीजणांना कॉलेज प्रमोशनच टेन्शन असतं किंवा कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश भेटू शकतो याचा टेन्शन असतं गावाकडच्या किंवा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर निकालाच्या आधी घरातलं वातावरण एकदम बदलून गेलेले असतात आई देवाला नवस बोलते बाबा शांतपणे विचारात राहतात किती मार्क येतील विद्यार्थी पास होईल का नाही आणि विद्यार्थी मोबाईलवर सतत बारावीचा रिझल्ट सर्च करत बसलेला असतो.
निकाल पाहायचे असेल तर विद्यार्थी प्रथम आपला सीट नंबर आणि आईचे नाव तयार ठेवणे आवश्यक आहे. आईचे नाव आणि सीट नंबर विद्यार्थीची जागा निश्चित करतात. या दोन माहितीशिवाय विद्यार्थी निकाल पाहू शकत नाही. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतो. निकाल पाहण्यासाठी इंटरनेट असलेला मोबाइल किंवा संगणक आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यावर वेबसाइटवर खूप ट्रॅफिक येते. त्यामुळे कधी कधी साइट हळू होते किंवा उघडतही नाही. अशा वेळी विद्यार्थी घाबरू नये. थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करावा. कारण जशी साइट उघडते, निकालासाठी त्यावेळी. पूर्ण महाराष्ट्रभरातून खूप सारे विद्यार्थी आपापला निकाल बघण्यासाठी ती साईट ओपन करत असतात त्यामुळे कदाचित ती साईट स्लो होत असेल.
निकाल पाहण्याची पद्धत अगदी सोपी आहे वेबसाईट उघडायची त्यामध्ये एच एस सी रिजल्ट असा पर्याय दिसतो त्यावर क्लिक केल्यानंतर सीट नंबर आणि आईचं नाव टाकायचं त्यानंतर सबमिट केलं की तुमचा निकाल स्क्रीन वरती दिसतो काही विद्यार्थी निकाल पाहताना एवढी घाबरतात की नंबर चुकीचा टाकतात त्यामुळे शांतपणे ही माहिती भरली पाहिजे ज्यावेळेस अशी चुकीची माहिती भरून दुसरंच काहीतरी दाखवल्या जातात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनात दुसरी शंका निर्माण होते. आणि बहुतांश विद्यार्थी घाबरतात पण.
निकाल आले की काही विद्यार्थी आनंदी होतात, तर काहींची वाट अडचणीत असते. लक्षात ठेवा, बारावीचा निकाल आयुष्याचा शेवट नाही. गावात अनेक उदाहरणे आहेत—ज्यांचे मार्क कमी होते, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, सरकारी नोकरी मिळवली, आणि आयुष्यात मोठे नाव कमावले. फक्त मार्कच मार्ग ठरवत नाही; मेहनत आणि जिद्द अधिक महत्त्वाची आहे. मार्क फक्त कागदावरचा नंबर आहे; खऱ्या आयुष्यात त्याची किंमत फक्त तेच जाणतात, जे आपल्या जिद्दीने पुढे जातात. मेहनतीने काहीतरी मोठा होऊन दाखवतो आपण जर मोठ-मोठे उद्योगपतींचे किंवा मोठमोठ्या लोकांचे काही उदाहरणे घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला असं माहिती पडेल की ते लोक एक तर शाळेमध्ये हुशार नव्हते त्यांना चांगले मार्क्स नव्हते कोणी कोणी शाळाही नाही केली तरी पण ते आज एवढ्या मोठ्या पोस्ट वरती एवढ्या मोठ्या जागेवरती गेलेले आहेत.
चला तर मग आता आपण बघुयात की तुम्ही हा निकाल लागल्यानंतर कुठे बघू शकता किंवा कसा बघायचा आहे.
सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण मागील वर्षाचा पॅटर्न पाहता बारावीचा निकाल साधारणपणे मे 2026 च्या दुसऱ्या आठवड्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन एचएससी निकाल बहुतेक वेळा मे महिन्यात लागतो.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन चा बारावीचा निकाल देखील मे महिन्यातच अपेक्षित असतो.
निकाल जाहीर झाल्यावर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकता. निकाल पाहताना सीट नंबर, रोल नंबर आणि आईचे नाव तयार ठेवा.
निकाल लागल्यानंतर तो अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल: